विकलांग मुलांसाठी बी.एल.डी.ई.-संभव ट्रस्टमध्ये शैक्षणिक करार
विजयपूर /प्रतिनिधि - दिपक शिंत्रेे
शहरातील प्रकृती कॉलनी येथे बी.एल.डी.ई. संस्था आणि संभव शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग (विकलांग) मुलांना समन्वित शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या "बी.एल.डी.ई. रघुकुल समन्वय शाळे" संदर्भातील शैक्षणिक करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
बी.एल.डी.ई. संस्थेचे प्रधान सचिव तथा विधान परिषद सदस्य सुनीलगौडा पाटील आणि संभव शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्टतर्फे अभिनव रुणवाल यांनी करारावर स्वाक्षरी केली.
यावेळी बी.एल.डी.ई. डीम्ड विद्यापीठाचे कुलाधिपती डॉ. वाय. एम. जयराज, कुलसचिव डॉ. आर. व्ही. कुलकर्णी, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे नोडल अधिकारी डॉ. ईश्वर बागोजी, संभव शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्टचे नरेंद्र ओस्वाल, निर्मल रुणवाल, अक्षत रुणवाल, श्रेया रुणवाल, लता रुणवाल, अनुषा रुणवाल, बी.एल.डी.ई. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. एन. बेंतूर, डॉ. आर. एन. करडी, डॉ. राजकुमार बागेवाडी, मानसशास्त्रज्ञ निवेदिता, श्रवणतज्ज्ञ रक्षिता, तंत्रज्ञ के. सी. मोहंती, डी. डी. स्वाईन, फिजिओथेरपिस्ट एम. ए. कुडची, एस. एस. कॅम्पसचे प्रशासकीय अधिकारी आय. एस. काळप्पनवर, समन्वय शाळेचे मुख्याध्यापक सिद्धनगौडा बिरादार, सामाजिक कार्यकर्त्या दानम्मा मज्जिगी, बी.एल.डी.ई. रुग्णालयाचे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी एकनाथ जाधव, नर्सिंग सुपरवायझर जयंती यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
