Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

अक्कलकोट-मुगळी बससेवेला प्रारंभ स्थानिकांची होणार सोय

Responsive Ad Here

 अक्कलकोट-मुगळी बससेवेला प्रारंभ

स्थानिकांची होणार सोय

 








दुधनी /प्रतिनिधि - निंगप्पा निंबाळ 

बहुचर्चित अक्कलकोट-मुगळी बससेवा अखेर सोमवारपासुन सुरु करण्यात आली आहे.याचा शुभारंभ शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्या संगीता पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.अखेर प्रशासनासोबतच्या संघर्षानंतर या बससेवेला मुहुर्त मिळाला आहे.

                 महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील जनतेसाठी मुगळीची बससेवा अत्यंत महत्वाची आहे.या बसने दररोज शेतकरी,विद्यार्थी, नोकरदारवर्ग,स्थानिक प्रवास करत असतात.पण गाडीची वेळ सोईस्कर नसल्याने काही दिवसांपुर्वी शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य शिवराज म्हेत्रे,पंचायत समिती सदस्या संगीता पाटील यांनी संबधित विभागास पत्रव्यवहार करत आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर अक्कलकोट आगाराकडुन सोमवारी मुगळीला एसटी सोडण्यात आली.आता ही गाडी दररोज अक्कलकोट आगारातुन दुपारी एक वाजता मुगळीला जाणार आहे.गावात गाडी येताच ग्रामस्थांनी जल्लोष केला.पं.स. सदस्या संगीता पाटील यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यावेळी चालक-वाहकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी  शरणगौडा पाटील सर सिद्धाराम बिराजदार,हणमंत रेवूर,हणमंत सरसंबी,मल्लप्पा पाटील,कल्लप्पा जमादार,

बसवराज बिराजदार,सायबण्णा माळी,सुरेश लोहार,मल्लप्पा माळी,विजयाकुमार कांदे,

हणमंत माळी,महादेवी शिंगे,

सुहासिनी सलीमट,अनिल माळी आदी उपस्थित होते.