Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

नोकरी करण्यारा हिंदू युवतींना संरक्षण देण्याची मागणी

Responsive Ad Here



नोकरी करण्यारा हिंदू युवतींना संरक्षण देण्याची मागणी







विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे  

नोकरीच्या ठिकाणी हिंदू युवतींवरील छळवणुकीच्या घटना वाढत असून, महाराष्ट्रातील नाशिक शहरातील बहुराष्ट्रीय कंपनी टीसीएसमध्येही अशी घटना घडल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी हिंदू युवतींना सुरक्षितता देण्याची मागणी करत हिंदूपर संघटनांच्या प्रमुखांनी  दयासागर पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले

   बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये हिंदू धार्मिक प्रथांना धक्का बसत असल्याचेही त्यांनी नमूद केले. हिंदूंच्या परंपरांचा अवमान करणाऱ्या घटना दिसून येत असून, देशभरातील अशा कंपन्यांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. यासाठी कठोर कायदे करावेत, अशी मागणी करण्यात आली.

   दयासागर पाटील म्हणाले की, विजयपूर जिल्ह्यात विविध समाज आणि पार्श्वभूमीतील कर्मचारी असलेल्या अनेक शैक्षणिक संस्था, आरोग्य सेवा केंद्रे, प्रशिक्षण संस्था आणि लघुउद्योग आहेत. सर्व कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित, सन्मानजनक आणि कायदेशीर कामाचे वातावरण सुनिश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

   या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. नोकरीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, कर्मचाऱ्यांच्या हक्कांबाबत आणि तक्रार निवारण व्यवस्थेबाबत जागरूकता निर्माण करावी, छळवणूक आणि कोणत्याही प्रकारच्या सक्तीविरुद्ध कडक धोरणे अवलंबण्यासाठी संस्थांना प्रोत्साहन द्यावे, अशा तक्रारींवर स्थानिक अधिकाऱ्यांनी सतर्क आणि त्वरीत प्रतिसाद द्यावा, तसेच तात्काळ मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली.

या वेळी कृष्णा गुन्हाळकर, प्रेमानंद बिरादार, महेंद्रकुमार नायक, कुमार गडगी, सुनील भैरवाडगी, शंकर हुगार, सिद्धू कल्लूर आदी उपस्थित होते.