Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

झोपलेल्या व्यक्तीवर अज्ञात तरुणाने कपड्यात दगड बांधून हल्ला

Responsive Ad Here


झोपलेल्या व्यक्तीवर अज्ञात तरुणाने कपड्यात दगड बांधून हल्ला








विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

 जिल्ह्यातील बसवन बागेवाडी शहरात झोपलेल्या व्यक्तीवर अज्ञात तरुणाने कपड्यात दगड बांधून हल्ला केल्याची घटना घडली आहे.

शहरातील आंबेडकर वर्तुळाजवळ दुकानासमोर झोपलेल्या मादेश इटगी यांच्यावर अज्ञात तरुणाने हल्ला केला.

हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

टॉवेलमध्ये दगड ठेवून आलेल्या त्या तरुणाने झोपलेल्या मादेश यांच्यावर अचानक हल्ला केला.

या हल्ल्यात त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली असून, अधिक उपचारासाठी त्यांना विजयपूर जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, बसवन बागेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी तरुणाचा शोध सुरू केला आहे.

तो मद्यधुंद अवस्थेत हल्ला केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.