Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

तीन लाख 50 हजार रुपयांची रोकड असलेली बॅग पोलीस ठाण्यात जमा करून प्रामाणिकपणाचे दर्शन

Responsive Ad Here


तीन लाख 50 हजार रुपयांची रोकड असलेली बॅग पोलीस ठाण्यात जमा करून प्रामाणिकपणाचे दर्शन







विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

 शहरातील मुंडेवाडी रुग्णालयाच्या रस्त्यावर सुमारे तीन लाख रुपयांची रोकड असलेली बॅग सापडल्याची घटना लक्षवेधी ठरली आहे. ही बॅग सापडलेल्या सलमा भानू व  ज्योती यांना रिक्षातून जात असताना सापडली यांनी ती स्वतःकडे न ठेवता गांधी चौक पोलीस ठाण्यात जमा करून प्रामाणिकपणा आणि मानवतेचे दर्शन घडवले.

   सलमा भानू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्या  आपल्या घरातून नवीन बसस्थानकाकडे जात असताना रस्त्यावर पडलेली बॅग त्यांच्या लक्षात आली. संशय आल्याने त्यांनी बॅग उघडून पाहिली असता त्यात पैसे असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ ती बॅग पोलिसांकडे सुपूर्द केली होती

 बॅग व रुपये हरविल्याची तक्रार करण्यास आलेल्या बसवनगौडा पाटील यांना आज ती रक्कम पोलिसांनी परत केली

  रुग्णालय परिसरात बॅग सापडल्यामुळे ती एखाद्या रुग्णाची किंवा त्यांच्या नातेवाईकांची असू शकते आणि त्यांना त्रास होऊ नये या मानवतेच्या भावनेतून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गांधी चौक पोलिसांनीही त्यांच्या या कृतीचे कौतुक केले असून, बॅगचा खरा मालक शोधून पैसे परत  दिले आहेत.