बेकायदेशीर तांदूळ वाहतूक: अन्न विभागाची कारवाई, तांदूळ जप्त
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
शहरातील आरएनएस शोरूमजवळ बेकायदेशीरपणे रेशनचा तांदूळ वाहतूक करत असताना अन्न विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून तांदूळ जप्त केला आहे.
आरएनएस शोरूमजवळ एका लॉरीतून बेकायदेशीरपणे तांदूळ वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच अन्न विभाग व पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. या कारवाईत 35,060 किलो तांदूळ आणि संबंधित लॉरी जप्त करण्यात आली असून टी. राजू यांच्याविरुद्ध जलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत अन्न विभागाचे सहाय्यक संचालक अमरीश तांडूर, अन्न निरीक्षक विजयकुमार गुमशेट्टी, जलनगर पीएसआय महेश संख, तसेच पोलिस कर्मचारी वाय. ए. राठोड,एच. एन. पुजारी आणि एम. आर. शिंदे सहभागी होते, अशी माहिती अन्न विभागाचे उपसंचालक विनयकुमार पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
