आई व तीन मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
काल संध्याकाळी
विजयपुर जिल्ह्यातील इंडी तालुक्याच्या मिरागी गावात घडलेली हृदयद्रावक घटना घडली असून एका आईने तीन मुलांना विहिरीत फेकून आणि नंतर स्वतः विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे.
राजश्री शंकरप्पा हल्लूर (वय २८) या आईने आत्महत्या केली तर
अनुश्री (वय ६), तनु (वय ३) आणि संतोष (वय १) या तीन अल्पवयीन मुलांचा पहिला विहीरीत फेकून दिले नंतर स्वतः विहिरीत उडी मारून आत्महत्या केली
ही घटना घडली तेव्हा राजश्रीचा पती शंकरप्पा गावात नव्हता राजश्रीचा पती शंकरप्पा हा खाजगी बस चालक आहे
पती शंकरप्पा आणि राजश्रीचे नातेवाईक आल्यानंतर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढले
रात्री मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी इंडी तालुका रुग्णालयात पाठवण्यात आले
आपल्या मुलांच्या मृत्यूसाठी पत्नी राजश्री जबाबदार असल्याची तक्रार पती शंकरप्पाने केली असून
राजश्रीच्या कुटुंबीयांनी ही आत्महत्या असल्याची तक्रार दाखल केली आहे.
मालमत्तेच्या वादातून राजश्रीने आपल्या मुलांना विहिरीत फेकून आत्महत्या केली असल्याची चर्चा गावात सुरू आहे, मालमत्तेचा वाद हेच यामागील कारण आहे. कि दुसरे काही कारण या घटनेमागील आहे हे सत्य पोलीस तपासातून समोर येईल.
शवविच्छेदन करण्यात आले असून चौघांचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. इंडी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
