Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

मिनी बस व कार यांच्यात अपघात, महिलेचा जागीच मृत्यू

Responsive Ad Here


मिनी बस व कार यांच्यात अपघात, महिलेचा जागीच मृत्यू






विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे  

मिनी बस आणि मारुती सुजुकी एर्टिगा कार यांच्यात  अपघात होऊन एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली आहे

मुद्देबिहाळ–निडगुंदी रस्त्यावर मादिनाळ क्रॉसजवळ हा अपघात झाला. बसमधील कस्तुरीबाई कृष्णा राठोड (वय 50) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या अपघातात संजय जैन (सुरपूर) आणि गुरप्पा चव्हाण (चलमितांड) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तालुका रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.


मुद्देबिहाळहून निडगुंदीच्या दिशेने जाणारी बस आणि निडगुंदीहून मुद्देबिहाळकडे येणारी कार यांची समोरासमोर धडक झाली.


घटनेची माहिती मिळताच मुद्देबिहाळचे सीपीआय महम्मद फसियुद्दीन, पीएसआय संजय तिपरेड्डी, गुन्हे शाखेचे पीएसआय आर. एस. बंगि तसेच इतर पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. ही घटना मुद्देबिहाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.