Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

दुधनी जि. प. प्राथमिक कन्नड मुलींची शाळाचे वार्षिक स्नेह सम्मेलन यशस्वी रितीने पार पडला

Responsive Ad Here

  दुधनी जि. प. प्राथमिक कन्नड मुलींची शाळाचे  वार्षिक स्नेह सम्मेलन यशस्वी रितीने पार पडला 







दुधनी/ प्रतिनिधी- 

येथील जि.प.प्राथमिक कन्नड मुलींची  शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन दुधनी मठाचे मठाधीश श्री.म.नि.प्र.डॉ.शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या सानिध्यात संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन दुधनी नगराध्यक्ष  प्रथमेश शंकर म्हेत्रे यांच्या हस्ते करण्यात आले व प्रतिमा पूजन  प्रशांत अरबाळे गट शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते व  नटराज पूजा दुधनी कृ.उ.बाजार समितीचे सभापती  सातलिंगप्पा  (अप्पू) परमशेट्टी  यांच्या हस्ते व दीप पप्रज्वलन सुरेश  शटगार मा.केन्द्र प्रमुख दुधनी व  संगीत पूजा  भीमाशंकर अंदेनी यांच्या हस्ते स्टेज पूजा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.जयश्री विलास पोतदार व उपाध्यक्ष  लक्ष्मीपुत्र बोळकोटगी यांच्या हस्ते करण्यात आले. 

   यावेळी श्री.म.नि.प्र.डॉ. शांतलिंगेश्वर स्वामीजी यांनी आपल्या वाणीतून पालकांनी आपल्या मुलांना उत्कृष्ट संस्कार कशा प्रकारे द्यावे ,कन्नड भाषाश्रेष्ठता ,भाषा आदरता ,कसे ठेवावे व मुलांना आपली संस्कृती कशी जोपासली पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले.



  कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व उपस्थिती म्हणुन दुधनी गावातील सर्व समाजाचे अध्यक्ष व सर्व संचालक, जिल्ह्यातून व तालुक्यातून सर्व शाळेचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक बंधु भगिनी,श्री.म.ज.मोरे राष्ट्रीय महासचिव प्राथमिक शिक्षक संघ,रणजित थिटे जिल्हाध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ सोलापूर,विजय तडकलकर राज्य उपाध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ, अभिजीत सुर्डिकर जिल्हा संपर्कप्रमुख प्राथमिक शिक्षक संघ,लक्ष्मीपुत्र तळवार जिल्हाध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ कन्नड विभाग, परमेश्वर किणगी तालुकाध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ,सिद्धाराम चौधरी जिल्हाध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ कन्नड विभाग, महेश गायकवाड केंद्र प्रमुख दुधनी,सर्वकेंद्राचे केंद्र प्रमुख व सर्व नगरसेवक,सिद्धाराम येगदी,रोप निंबाळकर,सैदप्पा झळळी,राजू इंगळे,बसवराज बंद्राड,बसवराज कोतली,दत्तात्रेय हिळ्ळी, निंगप्पा निंबाळ सर्व गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

 कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य व शिक्षण तज्ञ  आनंद बाहेरमठ,विलास पोतदार,अनिल राठोड, मुख्याध्यापक  महादेव बासरगाव, सिद्धारामेश्वर गोरे, परमेश्वर वाघोली,कु.मंदाकिनी सोनकांबळे यांनी परिश्रम घेतले तर  संतोष जोगदे व  गणपती पवार यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन उत्कृष्ट रितीने पार पाडले.