अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन महिला ठार
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
जिल्ह्यातील कोल्हार जवळील राष्ट्रीय महामार्ग 52 वर अज्ञात वाहनाच्या धडकेत ऑटोरिक्षामधील दोन महिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी रात्री कोल्हार येथील यूकेपी क्रॉसजवळ कोरेम्मादेवी मंदिराजवळ घडली आहे
यूकेपी क्रॉसहून राष्ट्रीय महामार्ग 52 मार्गे बिळगीकडे जात असलेल्या ऑटोरिक्षाला मागून अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात ऑटोरिक्षामधील अन्नपूर्णा नेवणी (वय 39) यांचा जागीच मृत्यू झाला, तर पारव महांतप्पा अन्नेप्पनवर (वय 65) यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन्ही महिला बागलकोट जिल्ह्यातील बिळगी तालुक्यातील मुत्तलदिन्नी आर.सी. गावच्या रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.
ऑटोमधील इतर काही जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व जण शेतात मजुरीचे काम आटोपून आपल्या गावाकडे परतत असताना हा अपघात झाला.
घटनास्थळी कोल्हार पोलीस ठाण्याचे पीएसआय अशोक नायक व पोलीस कर्मचारी यांनी भेट देऊन पाहणी केली.
