Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

सौहार्द सहकारी संघ वक्कूट नामनिर्देशित सदस्यपदी परशुराम चिंचली आणि दीपक शिंत्रे यांची निवड

Responsive Ad Here



    सौहार्द सहकारी संघ वक्कूट  नामनिर्देशित सदस्यपदी परशुराम चिंचली आणि दीपक शिंत्रे यांची निवड







विजयपुर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

 सौहार्द सहकारी संघ वक्कूट च्या संचालक मंडळ सदस्यांची बैठक अध्यक्ष संजय पाटील (कनमडी ) यांच्या अध्यक्षतेखाली चालुक्य नगर कार्यालयात झाली.

   या बैठकीत संचालक मंडळावर सहकार क्षेत्रातील अनुभवी आणि तज्ज्ञांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सहकार खाते निवृत्त अधिकारी परशुराम चिंंचली हे निवृत्तीनंतर विविध सहकारी संस्थांमध्ये सेवा देत आहेत आणि सुमारे २५ वर्षे सहकार क्षेत्रातील अनुभव असलेल्या दीपक शिंत्रे यांची वक्कूटच्या संचालक मंडळाचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

    या बैठकीत उपाध्यक्ष चंद्रशेखर कवटगी, संचालक मंडळाचे सदस्य सुरेश बिरादर, सिद्धु मल्लिकार्जुनमठ, अरुण वारद,, अरुण मठ, बालचंद्र मुंजाणे, यमनाप्पा सतीहाळ, कांतुगौडा पाटील,  राजू हंचाटे, मलकाप्पा रोट्टा, आर.डी.कुलकर्णी, विवेकानंद शिरोळकर , सतीश शिंत्रे, मौनेश पत्तार  उपस्थित होते.