गळा चिरून रौडीशूटरची निर्घृण हत्या :, पोलिसांची तातडीने कारवाई करीत चौघांना अटक
![]() |
| आरोपी |
विजयपूर/ प्रतिनिधी - दिपक शिंत्रे
आज सकाळी एका व्यक्तीचा गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली असून भीमाकाठीचा रौडीशूटरची निर्घृण हत्या झाल्याची घटना विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील बरगडी गावाच्या बाहेरील परिसरात घडली आहे. सिद्धराम दोंडीबा क्षत्री (वय २९) असे हत्या झालेल्या रौडीशूटरचे नाव आहे. हल्लेखोरांनी हत्या करून घटनास्थळावरून पलायन केले होते मात्र पोलीसांनी तातडीने कारवाई करीत दुपारी या प्रकरणी चौघांना अटक करण्यात यशस्वी झाले आहे.
लाल्या ऊर्फ रजनीकांत मरेप्पा गिरीनीवडर, परसू दशरथ क्षत्री, सर्जन सिद्धाराम क्षत्री, कांतप्पा गजप्पा क्षत्री (सर्व रा. बर्गुडी) यांना अटक करण्यात आली आहे
पैसा आणि महिलेशी संबंधित वादातूनच ही हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून पुढील तपास सुरू आहे. ही घटना इंडी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

