दुधनी जि.प.शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरा
दुधनी/प्रतिनिधी
दुधनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दुधनी नगरपरिषदेचे नुतन नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे यांनी सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेस पुजन करुन दिपप्रज्वलन केले. त्यानंतर शाळेतील मुले व मुली पारंपारिक पद्धतीचे वेशभूषा घालुन सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य, नाटक,भाषणे आदी कला विद्यार्थीनी सादर केले.
या सर्व कार्यक्रमानंतर प्रथमेश म्हेत्रे यांनी सावित्रीबाई फुले यांनी शैक्षणिक व स्त्री शिक्षणाविषयाची उल्लेखनीय कामाबद्दल विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. पुढे म्हेत्रे म्हणाले की स्ञी शिक्षणाचे दर्जा सुधारणेबरोबरच शाळेची भौतिक सोयी सुविधा देणेबाबत प्रथमेश म्हेत्रे यांनी आश्वासन दिले. व सर्व मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सुञसंचालन संतोष जोगदे यांनी केले आहे. या कार्यक्रमास श्री टोणगे, श्री बासरगांव, श्री कोरवु, कल्याणी गाडे, केंद्र प्रमुख महेश गायकवाड, सुनील आळंद, जन्मभूमी फौंडेशनचे शिवा झळक्की, जिडगे तसेच केंद्र शाळेचे शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे शेवटी पोमु राठोड यांनी आभार व्यक्त केले.
