Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

ट्रॅकर व जीपीएस लावलेला गिधाड चडचाणमध्ये आढळला, रहस्य उलगडले!

Responsive Ad Here



 ट्रॅकर व जीपीएस लावलेला गिधाड चडचाणमध्ये आढळला, रहस्य उलगडले!







विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

: विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोट्याळ गावातील एका शेतात ट्रॅकर, जीपीएस आणि कॅमेऱ्यासारखी उपकरणे लावलेला गिधाड आढळून आल्याने अनेक संशय निर्माण झाले होते. मात्र, अखेर हे रहस्य उघड झाले आहे. शेतात असामान्य अवस्थेत बसलेला मोठा पक्षी दिसताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ 112 वर कॉल केला. घटनास्थळी पोहोचलेल्या 112 पोलिसांनी गिधाडाला ताब्यात घेऊन झळकी पोलीस ठाण्यात हलवले.

    गिधाडाच्या पायाला ओळख क्रमांकाचा टॅग लावलेला आढळून आला असून, यावरून या पक्ष्यावर वैज्ञानिक संशोधन सुरू असल्याचे स्पष्ट झाले. पोलीस ठाण्यात आलेल्या वनाधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, हे गिधाड महाराष्ट्रातील नागपूरजवळील मेलघाट परिसरातून आले असल्याचे समोर आले.

  महाराष्ट्र वन विभागाने गिधाडांची जीवनशैली, स्थलांतर मार्ग आणि इतर पक्ष्यांविषयी माहिती गोळा करण्याच्या उद्देशाने जीपीएस आणि ट्रॅकर बसवले असल्याची माहिती मिळाली आहे. जीपीएस व ट्रॅकरच्या वजनामुळे गिधाड थकलेल्या अवस्थेत होते आणि त्यामुळे ते उडू शकत नव्हते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

  विजयपूर जिल्हा वनाधिकाऱ्यांनी गिधाडाला आपल्या ताब्यात घेऊन आवश्यक उपचार सुरू केले आहेत. सध्या गिधाडाच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात असून, पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्याला उडवून देण्याबाबत महाराष्ट्र वनाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाणार आहे. त्यांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती विजयपूर जिल्हा वनाधिकाऱ्यांनी दिली आहे.