Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

विजयपूर येथे 25 जानेवारीला राज्यस्तरीय आदि बनजिग वधू-वर संमेलन

Responsive Ad Here

 विजयपूर येथे 25 जानेवारीला 

राज्यस्तरीय आदि बनजिग वधू-वर संमेलन

 सोलापूर / प्रतिनिधी- 







रथसप्तमीच्या शुभ मुहूर्तावर, रविवार दि. 25 जानेवारी रोजी विजयपूर शहरातील बीएलडीई हॉस्पिटलजवळील श्री संगनबसव समुदाय भवन, लिंगदगुडी रोड येथे राज्यस्तरीय आदि बनजिग समाज वधू-वर संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष सोमलिंग कटावी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

हे संमेलन जिल्हा वीरशैव लिंगायत आदि बनजिग क्षेमवृद्धी संघटना, विजयपूर (रजिस्टर) व वधू-वर माहिती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे. कर्नाटकसह महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व तेलंगणा या शेजारील राज्यांतील आदि बनजिग समाजातील कुटुंबांना एकत्र आणणे, परस्पर ओळख वाढविणे तसेच समाजात प्रेम, स्नेह आणि सलोखा निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

आजच्या काळात अनेक पालकांना आपल्या पाल्यांसाठी योग्य स्थळ शोधताना अडचणी येत असून, या पार्श्वभूमीवर हे संमेलन समाजासाठी सुवर्णसंधी ठरणार आहे. वधू-वर मेळावा हा दोन कुटुंबांना जवळ आणणारा आणि वैवाहिक नात्याला सुदृढ करणारा उपक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले.

भव्य आणि खर्चिक विवाह सोहळ्यांना आळा घालून साध्या पद्धतीने विवाह करण्यास प्रोत्साहन देणे, तसेच शेतकरी कुटुंबातील युवक-युवतींच्या विवाहासाठी मदत करणे, हा या उपक्रमामागील महत्त्वाचा सामाजिक उद्देश असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ९४४८३३५५८७, ९४४८१४५७४२, ९४४८११०३६२, ९४४८६४४७३० या क्रमांकांवर संपर्क साधावा. वधू-वरांची माहिती संघटनेच्या कार्यालयात जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या  पत्रकार परिषदेस अध्यक्ष सोमलिंग कटावी, सचिव सुरेश परगोंडये, परशराम चिंचली, मल्लिकार्जुन बिरजगी तसेच गौरवाध्यक्ष सुरेश गच्चीनकटी उपस्थित होते.