विजयपूरात २५ जानेवारी रोजी आदि बनाजिगा समाजाच्या वधू -वर मेळावा
विजयपुर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
जिल्हा आदि बनाजिगा समाज संघटनेनेआदि बनाजिगा समाजाच्या वधू - वर परिचय मेळावा संदर्भात बैठकीत - दि. २५ जानेवारी रोजी शहरातील संगणबसवा मंगल कार्यालय, लिंगदगुडी जवळ येथे वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्याचा निर्णय करण्यात आला
जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या समाज बांधवांनी कार्यक्रमाचे आयोजन आणि मेळावा यशस्वी करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली प्रसिद्धी करण्यासाठी देखील एक योजना आखण्यात आली. यासाठी वधू आणि वरांच्या पालकांना त्याचा पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. संपूर्ण तपशील आणि संपर्क फोन नंबर लवकरच जाहीर केले जातील असे जिल्हा अध्यक्ष सोमलिंग कटावे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
