Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

६१ व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी मुंबईचा पुरुष-महिला संघ जाहीर

Responsive Ad Here

 ६१ व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी मुंबईचा पुरुष-महिला संघ जाहीर


बीडमधील राज्य खो-खो महासंग्रामासाठी मुंबई सज्ज!


पियुष घोलम व सेजल यादवकडे नेतृत्व



 








मुंबई क्रिडा प्रतिनिधी- बाळ तोरसकर 

मुंबई : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि बीड अमेच्युअर खो-खो असोसिएशनच्या आयोजनाखाली ६१ वी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा १८ ते २१ डिसेंबरदरम्यान बीड येथे होत असून, या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी मुंबई जिल्ह्याचा पुरुष व महिला संघ अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे. मुंबईच्या संघाकडून यंदा दमदार व संतुलित कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


 


पुरुष संघाचे नेतृत्व पियुष घोलमकडे तर महिला संघाच्या कर्णधारपदी सेजल यादव


मुंबई पुरुष संघाच्या कर्णधारपदी श्री समर्थ व्यायाम मंदिराच्या पियुष घोलमची निवड करण्यात आली आहे. संघात अनुभवी व युवा खेळाडूंचा सुरेख मेळ असून, मैदानावर वेग, चपळता व रणनीतीचा प्रभावी संगम पाहायला मिळणार आहे. तर मुंबई महिला संघाचे नेतृत्व सरस्वती कन्या संघाच्या सेजल यादवकडे सोपविण्यात आले आहे. महिलांच्या संघात विविध नामांकित क्रीडा संस्थांतील खेळाडूंचा समतोल असून दोन्ही संघाकडून आक्रमक व शिस्तबद्ध खेळाची अपेक्षा आहे.


 


पुरुष संघ : पियुष घोलम (कर्णधार), वेदांत देसाई, हितेश आग्रे, यश बोरकर, अनंत चव्हाण (सर्व श्री समर्थ व्यायाम मंदिर), सम्यक जाधव, ओमकार मिरगळ, हर्ष कामतेकर, जनार्दन सावंत (सर्व विद्यार्थी क्रीडा केंद्र), श्रेयस राऊळ, राहुल जावळे, रोहन टेमकर (सर्व सरस्वती स्पोर्ट्स क्लब), सनी तांबे (ओम समर्थ भावे व्यायाम मंदिर), गणेश साहू (अमर हिंद मंडळ), भूपेश गायकवाड (ओम साईश्वर सेवा मंडळ), विराज कोठमकर (प्रशिक्षक) आणि निलेश सावंत (व्यवस्थापक).


 


महिला संघ : सेजल यादव (कर्णधार), जान्हवी लोढे, खुशबू सुतार, नम्रता यादव (सर्व सरस्वती कन्या संघ), कादंबरी तेरवणकर, वैष्णवी परब, इषाली आंब्रे (सर्व ओम साईश्वर सेवा मंडळ), आरूषी गुप्ता, मुस्कान शेख (शिवनेरी सेवा मंडळ), संजना कुडव, रुद्रा नाटेकर (अमर हिंद मंडळ), मनाली काजरे, श्रीया नाईक (श्री समर्थ व्यायाम मंदिर), स्पुर्ती चांदुरकर (वैभव स्पोर्ट्स क्लब), प्रतिक्षा राज (आर्यसेना), गुरूदत्त शिंदे (प्रशिक्षक) व साजल पाटील (व्यवस्थापक)