Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

लोकायुक्तांच्या धाडीत रु दोन कोटी पन्नास लाखांची बेकायदेशीर मालमत्ता उघडकीस

Responsive Ad Here


लोकायुक्तांच्या धाडीत रु दोन कोटी पन्नास लाखांची

 बेकायदेशीर मालमत्ता उघडकीस







विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

जिल्हातील बसवनबागेवाडी येथील सहायक संचालक मल्लप्पा हनमंतप्पा यरझरी  यांच्याविरुद्ध त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा अधिक मालमत्ता संपादन केल्याची माहिती मिळाल्याच्या आधारे दिनांक 22-12-2025 रोजी विजयपूर लोकायुक्त पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर माननीय न्यायालयाकडून वॉरंट प्राप्त करून, आज सकाळी संबंधित आरोपी कर्मचाऱ्यांच्या विजयपूर शहरातील नवरसपूर येथील निवासस्थानी, बसवन बागेवाडी तालुक्यातील कनकाल गावातील फार्महाऊसवर, मुद्देबिहाळ शहरातील अधिकाऱ्यांच्या मामाच्या घरी तसेच ते कार्यरत असलेल्या कार्यालयात झडतीची कारवाई करण्यात आली.

   झडतीदरम्यान त्यांच्या विजयपूर नवरसपूर येथील घर, लॉकर व मामाच्या घरासह सुमारे ₹29,42,000/- रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने, वाहने तसेच इतर मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ₹2.50 कोटींहून अधिक बेकायदेशीर मालमत्ता संपादन केल्याचे उघडकीस आले आहे.

    ही संपूर्ण कारवाई  टी. मल्लेश, पोलीस अधीक्षक, कर्नाटक लोकायुक्त, विजयपूर यांच्या मार्गदर्शनाखाली  मल्लिकार्जुन तुळसिगेरी, डीएसपी,  बी. एस. पाटील, डीएसपी तसेच पोलीस निरीक्षक  आनंद व्ही. टक्कण्णावर,  आनंद डोणी,  निंगप्पा पूजारी, संगमनाथ होसमणी आणि कर्नाटक लोकायुक्त, विजयपूर व बेळगावी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली.