Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

निर्लज्जम सदा सुखी ..... निवृत्त कर्मचारी- अशोक पाटील

Responsive Ad Here

  निर्लज्जम सदा सुखी .....  निवृत्त कर्मचारी- अशोक पाटील 








 (अपवाद सोडला तर ही परिस्थिती आहे )

सोलापूर/ विशेष प्रतिनिधी 

जग कुठे चालले आपण कुठे चाललोय याचे तरी भान कर्मचारी अधिकारीने ठेवावे ,,मनाची नाही तर जनाची लाज बाळगावे वेळ काळेचे बंधन पाळावे 

 सर्व कर्मचारी अधिकारी बांधून नम्र पणे विनंती करण्यात येते की 

आपल्याला पाच दिवसाचा आठवडा केला ऑफीस चे टायमिंग आहे 

सकाळी 10.45  मिनिटांनी कामकाज चालू होतो आणि 6.15 मिनिटांनी ऑफीस बंद होतो कार्यालयीन कामकाजाचे बोर्ड लावने कायदेशीर बंधन कारक आहे पण बोर्ड  दिसत नाही याचे पण पालन केलेले नाही आणि करत नाहीत 

कर्म चारी अधिकारी यांना ओळख पत्र कम्पल्सरी  केले आहे, कोणाच्या ही गळ्यात ओळख पत्र दिसून येत नाही ( अपवाद सोडला तर) आणि कार्यालयीन वेळा चे बोर्ड पण लावले नाहीत 

तसेच कर्मचारी अधिकारी याच्या टेबलवर नेमप्लेट च दिसून येत नाही आणि आणि अधिकाऱ्यांनी ते लावण्याची तश्दी घेतलेली नाही 

जर खासदाराचे नेमप्लेटवर जर राखीव असेल तर ( अनुसूचित जाती/जमाती च उल्लेख असतो 

याच धर्तीवर कर्मचारी अधिकारी चे नेमप्लेट वर नेमणुकीचे आरक्षण चे उल्लेख असावा असे वाटतो 

 ........आणि ......

येतात 10.3ते 10.45 वाजेपर्यंत आल्यावर गप्पा टप्पा मारतात थोडे काम करतात साहेब असेल तर आणि जेवणाची वेळ होते  1.3 ते 2 जेवणाचे लंच होतो 

2.3ते 3 वाजेपर्यंत येत नाहीत आले तरी साहेब कुठे गेलेओ  विचारले तर साहेब कडे गेलेत साहेब बी पण जागेवर नसतात 

जनता हेलपाटे मारून मरून जातो 

अशा प्रकारे ** जन सेवा हीच ईश सेवा ** म्हणून जिल्हा परिषद बिल्डिंग वर मोठ्या दिमाखाने बोर्ड रंगविलेले आहे ते दिमाखदार पणे मिरवतो ( अपवाद सोडला तर )


आता ही रस्त्याची अवस्था बघितली तर काय अवस्था आहे बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे हेच कळत नाही त्यामुळे दरवर्षी  रस्त्यावरून जाताना खड्डा चुकून गाडी वळविताना किंवा खड्ड्यात पडून लाखो निष्पाप नागरिकांची बळी जातो ,, यापापाचे धनी संबंधित कर्मचारी अधिकारीची आणि ठेकेदार च आहेत याचा शाप आपल्या कुटुंबाला लागल्याशिवाय राहणार नाही ,तुमचा संसार उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही ,, हे जे उपद्व्याप करता कश्यासाठी करता रे मित्रानो सातव्या वेतन आयोगाने भरपूर पगार वाढ केलेला आहे , काम आठ तास करत नाहीत ,जागेवर भेटत नाहीत एवढे वेळ आणि पैसा शासनाने तुमच्या झोळीत टाकलेले आहे, मोलमजुरी करून खाणारा महिना १०,१५ हजार रुपये कमवितो रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या मजुरांना किती पगार देता तरी ते जीवन आनंदात जगतात आणि तुम्हाला या पाचपन्नास हजार  लाख रुपया चे पगारात घर भगत नाही का? जर भगत नसेल तर आपल्या खानदानी ल बायको ,पोरी मुलाला कोणत्या तरी धंद्याला लावा ,त्यासाठी शासनाकडे बिनव्याजी कर्जाची मागणी साठी आंदोलन करा ,शासन तुमच्यावर उदार आहे . लगेच मागणी मान्य होईल , सामान्य जनतेला नागरिकांना त्रास देऊ नका ,असे तुमच्या वागण्याने तुम्ही स्वतः तुमचे खड्डा खोदून ठेवत आहात याची भान ठेवा सरकार आपल्याला ५८ झाल्यानंतर हाकलतो का तर हे कामाचे नाही म्हणून आणि त्यात या तुमच्या नीतिमत्ता आणि बुद्धमत्ता गहाण ठेऊन भ्रष्ट मार्गाने ,गैर मार्गाने  पैसा कमून  आपल्या शरीराला ,BP, मूळव्याध ,  हार्ट अटॅक , कॅन्सर, लठ्ठपणा , लकवा विविध आजाराला आमंत्रण देऊन हा सर्व पैसा कुंटन खाण्याला दवाखान्यात स्वाहा करावा लागतो ,अर्पण करावा लागतो आणि  सेवा निवृत्त चे अगोदरच  आपला इह यात्रा संपतो आणि ज्यांना पेन्शन आहे ते पेन्शन पण भोगू शकत नाहीत म्हणू सामान्य नागरिकाचे , दीन दुबळ्या कुटुंबाचे  संसार उद्ध्वस्त करू नका आणि बळी घेऊ नका रे मित्रानो 

अरे रस्त्यावरचा भिकारी सुद्धा मिळो अथवा न मिळो आनंदात जीवन जगतो याचा जरा आत्मचिंतन करा 


हा देश, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज 

शाहू आंबेडकर फुले यांचा पुरोगामी महाराष्ट्राचे राज्य आहे आणि खासकरुन साधू संताची आणि वारकरी संप्रदाया चे महाराष्ट्र आहे 

याचा थोडा तरी आदर्श राज्यकर्त्यांनी आणि कर्मचारी अधिकारी ने घ्यावा आणि आजपासून आपण या प्रमाणे वागावे.