वीरशैव लिंगायत पंचमसाली समाजाच्या वतीने- प्रतिभा पुरस्कार आणि सन्मान समारंभ 7 डिसेंबर रोजी
विजयपुर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत पंचमसाली समाजातील प्रतिभावंत मुलांसाठी शहरातील कंदगल श्री हणमंतराव रंग मंदिर येथे प्रतिभा पुरस्कार आणि सन्मान समारंभ कार्यक्रम रविवार, ७ डिसेंबर रोजी सकाळी १०:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
२०२४-२५ या वर्षात एसएसएलसी आणि द्वितीय पीयूसी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या प्रतिभावंत विद्यार्थी/विद्यार्थ्यांनीसाठी प्रतिभा पुरस्कार आणि सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला आहे
या कार्यक्रमात कुडळसंगमाच्या पंचमसाली पीठाचे जगद्गुरू श्री बसव जय मृत्युंजय वीरशैव लिंगायत जगद्गुरू श्री डॉ. महादेवेश्वर शिवाचार्य
मनगुळी हिरेमठ येथील श्री अभिनव संगनबसव शिवाचार्य बुराणापूरच्या योगेश्वरी माता दिव्य सानिध्यात होणाऱ्या
कार्यक्रमाचे उद्घाटन हवेरीचे प्रभारी मंत्री शिवानंद पाटील, शहराचे आमदार बसनगौडा पाटील यतनाळ, कित्तुरानी चेन्नम्मा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतील, प्रमुख पाहुणे देवराहिप्परगीचे आमदार राजुगौडा पाटील, सिंदगीचे आमदार अशोक मनगुळी,, बाल अकादमीचे अध्यक्ष संगमेश बबेलेश्वर, आदी उपस्थित राहणार आहेत. प्राधिकरण आयुक्त राजशेकर डंबल, डीवायएसपी बसवराज यलगार, कर्नाटक राज्य बियाणे आणि सेंद्रिय माजी अध्यक्ष विजुगौडा पाटील, शांतिनिकेतन फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेश बिरादार, के.आर.व्ही.लिंग पंचमसाली समाजाचे राज्याध्यक्ष सोमनगौडा मालीपाटील यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
समाज बंधू-भगिनी, समाज बांधवांनी या कार्यक्रमस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे कर्नाटक राज्य वीरशैव लिंगायत पंचमसाली क्षेमभिवृध्दी संघाचे जिल्हाध्यक्ष इराण्णा होसटृ यांनी प्रसिद्धीपत्रकात कळविले आहे.
