श्री सिद्धेश्वर बॅकेच्या संचालक मंडळाच्या सदस्यांनी बँकेच्या प्रगतीसाठी एकमताने कार्य करावे - मंत्री शिवानंद पाटील
विजयपूर/ प्रतिनिधी -दिपक शिंत्रे
श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या नव्याने निवडून आलेल्या संचालकांनी कोणतेही मतभेद न ठेवता एकमताने, सौहार्दपूर्ण पद्धतीने बँकेचा विकास साधून तिला प्रगतीच्या दिशेने नेण्याची गरज असल्याचे मत वस्त्रोद्योग, ऊस विकास, साखर व कृषी बाजार समितीचे मंत्री शिवानंद पाटील** यांनी व्यक्त केले.
विजयपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या नव्याने निवडून आलेल्या संचालकांचा सत्कार करताना मंत्री बोलत होते. त्यांनी सांगितले की, डॉ. फ. गु. हलकट्टी** यांसारख्या थोर व्यक्तींनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेची स्थापना केली होती. ही बँक विजयपूर जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय प्रतिष्ठित आहे. ही बँक आपल्या पूर्वजांनी बांधलेली, वाढवलेली आणि घडवलेली एक महत्वाकांक्षी संस्था आहे. त्यामुळे तिचे भविष्यात उज्वलपणे वाढवणे ही जबाबदारी आता तुमच्यावर असून, ती समर्थपणे पार पाडा, असे आवाहन त्यांनी केले.
ते पुढे म्हणाले, की बँकेचे सदस्य तुम्हाला पुन्हा पुन्हा निवडून देत आहेत, यावरून तुमच्यावर असलेला विश्वास दिसून येतो. त्यामुळे या विश्वासाला धक्का न लावता बँकेच्या प्रगतीसाठी निष्ठा, बांधिलकी आणि सेवाभावाने काम करणे आवश्यक आहे. सर्वांनी एकजुटीने कार्य करत बँकेला पुढे नेण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेचे भागधारक आणि मतदार तुमच्यावर दाखवत असलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता, बँकेला योग्य मार्गावर घेऊन जा. शंभर वर्षांहून अधिक इतिहास असलेली, जिल्ह्याची शान असलेली ही प्रतिष्ठित सहकारी बँक आर्थिकदृष्ट्या अधिक प्रगती करत "शेड्यूल बँक" दर्जा मिळवावा**, अशा शब्दांत त्यांनी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी *ईरण्णा एम. पट्टणशेट्टी, डॉ. संजीव एस. पाटील मुळवाड, वैजनाथ डी. करपूरमठ, आर. एम. पाटील (उप्पलदिन्नी), विश्वनाथ एस. पाटील (मसबिनाळ), रमेश एच. बिदनूर, गुरु गच्छिनमठ, सौ. करुणा पाटील, सौ. बोरम्मा बी. गोब्बूर, सौ. सौभाग्य एस. भोगशेट्टी, प्रकाश एस. बगली, रवींद्र बिज्जरगी, सायबण्णा सी. भोवी, अमोघसिद्ध नायकोडी, गुरुराज सी. गंगणळी, राजशेखर एस. कत्ती, ज्येष्ठ सहकारी नेते संगनगौड पाटील आणि एम. आर. पाटील (बळ्ळोळ्ली) यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
