Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

शिवसेना पक्ष व म्हेत्रे परिवारातर्फे फराळ वाटप

Responsive Ad Here

 शिवसेना पक्ष व म्हेत्रे परिवारातर्फे फराळ वाटप 









दुधनी/ प्रतिनिधी- लक्ष्मीकांत पोतदार 

 यंदाच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे गोरगरिब, शेतकरी व लहान व्यापारी वर्गात दिवाळीचा सण फारसा होत नसल्याचे कारण म्हेत्रे कुटुंबियांनी विचार करून आज दुधनी शहरात श्री शांतलिंगेश्वर कल्याण मंडप, म्हेत्रे प्रशाला, रामवाडी, दुधनी रेल्वे स्टेशन अशा विविध ठिकाणी शिवसेना पक्ष व म्हेत्रे परिवारातर्फे फराळ वाटप करण्यात आला. 

       म्हेत्रे परिवार गेल्या साठ वर्षांपासून दुधनी शहरातील व तालुक्यातील गोरगरिबांना कसलाही अडचण येऊ देत नाही हे लोकांनमधुन येत होते आज सत्तेत नसताना देखील गोरगरिबांचे कल्याण करणारे म्हेत्रे परिवारातर्फे दिसुन येत असल्याचे चर्चा शहरात चालु आहे. 

    या कार्यक्रमात प्रथम श्री शांतलिंगेश्वर कल्याण मंडपात श्री मठाचे डाॅ. शांतलिंगेश्वर महास्वामीजींच्या हस्ते दिप प्रज्वलन करून श्रीमठाधीश, सौ.वैशालीताई म्हेत्रे, माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे आदींनी महिलांना फराळ वाटप केले तसेच म्हेत्रे प्रशालेत मा.मंत्री सिध्दाराम म्हेत्रे ,बंधु शंकर म्हेत्रे, प्रथमेश म्हेत्रे, शिवानंद माड्याळ, सिध्दाराम येगदी, सातलिंगप्पा परमशेट्टी, सिध्दाराम मल्लाड,शिवानंद हौदे, बसवराज हौदे, सुनील आळंद, बसवराज बंद्राड, रामचंद्र गद्दी, धोडमनी सर आदींनी फराळ वाटप त परिश्रम घेतले.

     या फराळाचा आस्वाद संपुर्ण दुधनीकरांना झाल्याची आनंद  व म्हेत्रे कुटुंबियांना आशिर्वाद दुधनीतील लोकांन मधुन देत असल्याची चर्चा  होत आहे.