Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

सार्वजनिक ठिकाणी नमाजसाठी परवानगी देऊ नये – आ.यतनाळ यांची मागणी

Responsive Ad Here



आमदार बसनगौडा पाटील यतनाळ यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र

सार्वजनिक ठिकाणी नमाजसाठी परवानगी देऊ नये –  आ.यतनाळ यांची मागणी









विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

 सार्वजनिक ठिकाणी, शासकीय जागांवर नमाजसाठी परवानगी दिली जाऊ नये, कारण हे सरकारच ज्या नियमावलींचा अवलंब करत आहे त्याच्या विरोधात आहे.  सर्व धर्मीय लोकांसाठी समानपणे लागू होणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्वरित आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आमदार बसनगौडा पाटील यतनाळ यांनी केली आहे.


या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना एक पत्र लिहिले असून, खासगी संस्था, एनजीओ, शासकीय मालमत्ता, शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक ठिकाणी खासगी किंवा संस्थात्मक हेतूंनी वापर करण्यास बंदी घालणाऱ्या कर्नाटक सरकारच्या अलीकडील निर्णयाच्या पार्श्वभूमीवर, समाजातील सर्व घटकांसाठी एकसमान, निष्पक्ष आणि तटस्थ धोरण लागू करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

ते पुढे म्हणाले की, सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी न घेता लोक सार्वजनिक रस्ते आणि शासकीय आवारांमध्ये नमाज अदा करताना दिसून येतात. अशा कृतींमुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे शासकीय कार्यालये किंवा इतर कोणत्याही सरकारी अनुदानित संस्थांमध्ये नमाजसाठी परवानगी देऊ नये.

राज्यभरातील सर्व उपजिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना रस्ते, पादचारी मार्ग किंवा शासकीय आवारांमध्ये नमाज अदा होऊ नये, यासाठी आवश्यक ती निर्देश देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच, सार्वजनिक ठिकाणी धार्मिक कारणांसाठी होणाऱ्या कोणत्याही अनधिकृत वापरावर कारवाई करण्यासाठी, कर्नाटक पोलीस कायदा आणि वाहतूक नियमांअंतर्गत एक स्पष्ट SOP (Standard Operating Procedure) किंवा परिपत्रक तयार करण्याचा विचार सरकारने करावा, असेही त्यांनी सुचवले आहे.

या उपाययोजनांची एकसमान अंमलबजावणी धर्मनिरपेक्षता, कायद्यापुढील समानता आणि सार्वजनिक शिस्त यांच्याशी सरकारच्या बांधिलकीला बळकटी देईल. त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी, शिस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि वाहतुकीतील अडथळे टाळण्यासाठी, सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करण्यास त्वरित बंदी घालावी, अशी स्पष्ट मागणी त्यांनी पत्रात केली आहे.