Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

विजयपूर जिल्ह्यात रेकॉर्डवरील गुन्हेगार पोलिसांच्या गोळीबारात ठार

Responsive Ad Here



विजयपूर जिल्ह्यात रेकॉर्डवरील गुन्हेगार पोलिसांच्या गोळीबारात ठार









विजयपुर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

 विजयपूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील रामपूर गावाच्या हद्दीत पोलिसांच्या गोळीबारात एक रेकॉर्डवरील गुन्हेगार ठार झाल्याची घटना घडली आहे. मृत गुन्हेगाराचे नाव युनूस इक्लास पटेल (वय 35) असे आहे. युनूस पटेल हा कुख्यात गुन्हेगार आणि खुनी होता.

   काल युनूसने एका व्यक्तीस चाकू दाखवून त्याच्याकडून 25 हजार रुपये लुटले होते. त्यानंतर त्या व्यक्तीची स्कूटरही हिसकावून पळून गेला होता. या प्रकरणी  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी युनूस आपल्या मूळगावी, आलमेल तालुक्यातील देवनगाव कडे निघालेला होता. याची माहिती मिळताच पोलीस रामपूर परिसरात त्याला अटक करण्यासाठी पोहोचले.

तेव्हा युनूसने पोलिसांवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याने दोन पोलीस कॉन्स्टेबल आणि इन्स्पेक्टर प्रदीप तळकेरी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या गोंधळात इन्स्पेक्टर तळकेरी यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. इशारा देण्यासाठी त्यांनी हवेत गोळी झाडली. पण युनूसने शरण येण्यास नकार दिल्यामुळे शेवटी इन्स्पेक्टर तळकेरी यांनी त्याच्या पायावर गोळी झाडली. त्याला तात्काळ सिंदगी तालुका रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले आणि नंतर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.

मात्र जिल्हा रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार युनूसचा मृत्यू झाला आहे. युनूसवर दोन खून, एका खुनाचा प्रयत्न आणि एकूण 12 गुन्हे दाखल होते. या घटनेची सखोल चौकशी केली जात असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी दिली आहे.