Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

संत नरहरी महामंडळाच्या योजना जास्तीतजास्त सुवर्णकारापर्यंत पोचवा - संजय मैंदर्गीकर

Responsive Ad Here


संत नरहरी महामंडळाच्या योजना जास्तीतजास्त सुवर्णकारापर्यंत पोचवा  - संजय मैंदर्गीकर







 सोलापूर/ प्रतिनिधी 


सोलापूर -- संत नरहरी आर्थिक  विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनांचा लाभ मिळण्यासाठी सोनार समाजातील प्रत्येक योग्य व पात्र लोकांपर्यंत पोचला पाहिजे याकरिता सोनार समाजाच्या विविध संघटना, संस्था, नेते मंडळी, सामाजिक कार्यकर्ते यांनी  प्रयत्न केले पाहिजे. तरच या योजनांची अंमलबजावणी होऊन अधिकाधिक सोनार बांधवाना त्याचा फायदा होईल. यावर भर देण्याचे आवाहन सोनार समाज संस्था, सोलापूर चे अग्रणी प्रवर्तक श्री. संजयजी मैंदर्गीकर यांनी केले आहे.

महामंडळाची 20 % बीज भांडवल योजना, एक लाख रु. पर्यंतची थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा रु. 15 लाख पर्यंतची कर्ज योजना, गट कर्ज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण योजना, महिला स्वयं सिद्धी व्याज परतावा योजना, या शिवाय या महामंडळाच्या योजना अंतर्गत येणारे इतर सर्व व्यवसाय.

या योजनांची अंमलबजावणी  पारदर्शक व परिणाम कारक पद्धतीने होऊन जास्तीतजास्त लाभार्थीना त्याचा फायदा व्हावा. या योजनांची माहिती गरजू पर्यंत योग्य प्रकारे पोहचविणे ही महत्वाची जबाबदारी आपणा सर्वांची असून या योजनांचा प्रचार व प्रसार प्रभाविपणे करण्याची जबाबदारी समाजातील विविध संघटना, संस्था, सामाजिक कार्यकर्ते, नेते मंडळींची आहे. महामंडळाच्या योजनांच्या लाभाच्या प्रक्रियेत  कोणतीही अडचण येऊ नये तसेच योग्य लाभार्थीची निवड करून त्यांना वेळेवर आर्थिक मदत मिळावी. यासाठी यंत्रणानी विशेष लक्ष द्यावे अशी विनंतीही त्यांनी केली आहे.