Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

जिल्ह्यातील प्रतिभावंत खेळाडूंना ओळखून प्रोत्साहन देणार – खासदार डॉ. सुधा मूर्ती

Responsive Ad Here

 


जिल्ह्यातील प्रतिभावंत खेळाडूंना ओळखून प्रोत्साहन देणार – खासदार डॉ. सुधा मूर्ती








विजयपूर/प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

 खेळ आणि सायकलिंग स्पर्धांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवू शकणाऱ्या जिल्ह्यातील प्रतिभावंत खेळाडूंना ओळखून, आवश्यक मूलभूत सुविधा पुरवून त्यांना प्रोत्साहन दिले जाईल, असे राज्यसभा खासदार डॉ. सुधा मूर्ती यांनी सांगितले.

   त्या विजयपूर शहरातील सोलापूर रोडवरील युवा सक्षमीकरण आणि क्रीडा निलय येथे खासदार निधीतून रु. 200 लाखांच्या खर्चाने बांधण्यात येत असलेल्या जिल्हा क्रीडा शाळा-निवास निलय (वसतीगृह) इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलत होत्या.

    डॉ. मूर्ती म्हणाल्या, खेळाडूंना अत्याधुनिक साधनसामग्रीसह उच्च दर्जाचे प्रशिक्षण देणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. खासदार निधीतून उत्कृष्ट दर्जाच्या सायकलिंग, व्हॉलीबॉल आणि बास्केटबॉलसाठी निवास निलय ( वसतीगृह) बांधले जात आहे. यामुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल आणि ते उत्तम कामगिरी करू शकतील. तसेच अत्याधुनिक उपकरणांसह सायकलिंग, बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉलसाठी मैदानांची उभारणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

  या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. आनंद के. यांनी सांगितले की, लवकरच सायकलिंग व्हेलोड्रोमचे उद्घाटन केले जाईल. जिल्ह्यातील क्रीडा विकासासाठी पूरक वातावरण निर्माण करून खेळाडूंना प्रोत्साहन दिले जाईल. डॉ. सुधा मूर्ती यांनी जिल्ह्यातील क्रीडा विकासासाठी मोठी मदत केली असून, सरकारदेखील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक विकासात्मक योजना राबवत आहे, असे त्यांनी सांगितले.


कार्यक्रमात राष्ट्रपुरस्कार विजेते डॉ. जावेद जमादार, जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष भीमसेन कोकरे, क्रीडा विभागाचे सहाय्यक संचालक राजशेखर धैवाडी, राज्य सायकलिंग संघटनेचे चेअरमन राजू बिरादार, जिल्हा ऍथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष एस.एस. हिरेमठ, वेटलिफ्टिंग असोसिएशनचे सचिव चंद्रकांत तारनाळ, योजना संचालक आकाश तिम्मशेट्टी, जी.एम. मळजी, कार्यालय अधीक्षक सौ. प्रियांका तसेच विविध क्रीडा प्रशिक्षक आणि निवास निलयातील खेळाडू उपस्थित होते.

एम. वाय. चिंचली यांनी स्वागत केले आणि प्रशिक्षक अलका फडतरे यांनी आभार मानले.