पुराच्या पाण्यात अडकले रिधोरे गावकरी
पूरग्रस्तांना तातडीने सुरक्षित स्थळी हळविण्यात यश
अक्कलकोट तहसील आपदा पथक घटनास्थळी दाखल
अक्कलकोट/प्रतिनिधी- प्रविणकुमार बाबर
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राला मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पूरस्थिती चिंताजनक आहे. अक्कलकोट तहसील कार्यालयाचे आपदा पथक तैनात झाले असून, माढा तालुक्यातील रिधोरे गावातील पूरग्रस्तांना तातडीने सुरक्षित स्थळी हळविण्यात आले असून, शेती आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीने झोडपून काढले आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे सर्वत्र पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या ठिकाणी नद्यांना आलेल्या पुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. सध्या प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य वेगाने सुरु आहे. राज्यातील पूर आलेल्या अनेक ठिकाणी अडकलेल्या लोकांना अक्कलकोट तहसील कार्यालय आपदा पथक यांच्या मदतीने तातडीने मदत केले जात असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात पाहवयास मिळत आहे.
सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर जिल्ह्याला गेल्या दहा दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपले आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व नद्या आणि धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. रात्री झालेल्या पावसामुळे
सिना कोळेगाव धारणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस चालू असल्याने सिना कोळेगाव धरणातून आज दि :- 23/09/2025 रोजी एकूण 61000 क्युसेकने सुरू असलेला विसर्ग आज पहाटे 5:30 वाजता वाढ करून * 65500 क्युसेक एवढा करण्यात आला आहे.
सिना नदीच्या दोन्ही तिरावरील शेतकरी, नागरिक या सर्वांनी याबाबत सावधानता बाळगावी.पाण्याची आवक व पावसाचे प्रमाण लक्षात घेता नदीपात्रातील विसर्गात वाढ/कमी होण्याची शक्यता आहे.
असे आव्हान जिल्हा व तालुका महसूल प्रशासना च्या मध्यमातून करण्यात असून,
धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. ज्यामुळे रिधोरे गावात नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच माढा तालुक्यातील रिधोरे गावात नदीच्या पुरात 36 लोक अडकल्याची माहिती समोर आली होती. ही माहिती मिळताच रात्री अक्कलकोट येथून तहसील कार्यालयाचे पथक दाखल झाले. या पथकाने केलेल्या बचावकार्यात 28 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून, 8 जणांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले असून, उर्वरित लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या आपदा पथक अक्कलकोट चे तहसीलदार विनायक मगर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपदा मित्र प्रविणकुमार बाबर, जाकीर कागदे, गोपीनाथ माने, रामचंद्र माने, हनुमंत सानप यांचा समावेश असून, आज पहाटे पासून, आतापर्यंत 40 लोकांना सुरक्षित स्थळी हळविण्यात यश आले आहे.