जात - लिंगायत अदिबनजग, उपजाती अदिबनजग अशी नोंदवावी - सोमलिंग कटावी
विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
कर्नाटक राज्य मागासवर्ग आयोगाकडून सुरू असलेल्या सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षणात अदिबनजग समाज बांधवांनी धर्म हिंदू, जात लिंगायत अदिबनजग, उपजाती अदिबनजग अशी नोंदवावी असे आवाहन विजयपूर जिल्हा वीरशैव लिंगायत अदिबनजग क्षेमाभिरुद्ध संघाचे अध्यक्ष सोमलिंग कटावी व गौरव अध्यक्ष सुरेश गच्चीनकटी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
लिंगायत अदिबनजग समाज बांधवांनी एकत्र येऊन आपल्या समाजातील चालीरीती, रुढीपरंपरा व संस्कृती टिकवण्याचे आवश्यकता असून, त्याचबरोबर समाजाच्या विकासासाठी समाज एकत्र येणं गरजेचं असल्याचं त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.