Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

डोणी नदीत वाहून गेलेल्या बाईकस्वारांचा शोध कार्य सुरूच

Responsive Ad Here



डोणी नदीत वाहून गेलेल्या बाईकस्वारांचा शोध कार्य सुरूच








विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

तालिकोटे शहराच्या उपनगरात  डोणी पुलावर वाहत्या पाण्यात वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध कार्य सुरूच आहे.

ही घटना दिनांक २४ सप्टेंबर रोजी घडली होती.

तालिकोटे तालुक्यातील वडवडगी गावातील महांतेष आणि संतोष हे दोघे बाईकवरून पूल ओलांडण्याचा प्रयत्न करताना नदीत वाहून गेले.

अग्निशमन दल आणि स्थानिकांनी महांतेषला वाचवले, मात्र संतोषसाठी शोध सुरू ठेवण्यात आला होता.

घटनेला तीन दिवस झाले तरीही संतोष हडपद याचा काहीच थांगपत्ता लागलेला नाही.

अनुभवी पोहणाऱ्यांच्या मदतीने, बोट आणि अग्निशमन दलाच्या साहाय्याने शोधकार्य सुरू आहे.

  नदीच्या काठावर तळ ठोकलेले कुटुंबीय अजूनही शोध का घेत नाहीत, असा प्रश्न उपस्थित करीत पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाशी वादावादी ही करीत आहे.

अधिकार्‍यांनी आश्वासन दिलं आहे की, संतोषचा शोध घेणं थांबवलेलं नाही आणि सर्व शक्य प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी कुटुंबीयांना समजावलं आहे