Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

मुस्तफा ईनामदार मित्र परिवाराच्या वतीने आरोग्य शिबिर संपन्न

Responsive Ad Here

 मुस्तफा ईनामदार मित्र परिवाराच्या वतीने आरोग्य शिबिर संपन्न







दुधनी / प्रतिनिधी - लक्ष्मीकांत पोतदार 

१५०० व्या ईद ए मिलाद (प्रेषित मुहम्मद साहेब यांच्या जयंती) निमित्त मुगळी येथे नवभारत सामाजिक प्रतिष्ठान आणि मुस्तफा ईनामदार यांच्या वतीने भव्य आरोग्य आणि रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.


ह्या शिबिरामध्ये हृदय रोग ECG तपासणी, ब्लड प्रेशर तपासणी, मधुमेह तपासणी सोबत २००० रुपये किंमती एवढे रक्त तपासण्या मोफत देण्यात आल्या. या शिबिरात नागरिकांनी भरघोस हजेरी लावली आणि शिबिराचा लाभ घेतला. आरोग्य तपासणी सोबतच रोग निदान सुधा आयोजित करण्यात आले होते ज्या मध्ये मधुमेह, ब्लड प्रेशर, सर्दी ताप व इतर सर्व आजारांसाठी महाग व उपयुक्त अशी औषधे  मोफत वितरित करण्यात आली. 

प्रेषित मोहम्मद साहेब यांची मानवता धर्माची शिकवण,आणि जनसेवेचा वडिलोपार्जित मिळालेला वारसा जपून लोकांसाठी आणि जनतेच्या सेवेसाठी सदैव अशीच कामे करत राहणार असल्याचे मुस्तफा ईनामदार यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.

तसेच या शिबिरामध्ये सर्व धर्म समभाव चा संदेश देत सर्व धर्मीय प्रार्थनास्थळांनी ह्या शिबिराचे संदेश दवंडी आणि प्रवचना द्वारे लोकांपर्यंत पोहोचवले आणि एक चांगला संदेश दिला.


या शिबिराच्या यशस्वी होण्यासाठी मोहसीन भाई ईनामदार मित्र परिवार, शांभवी इंडस्ट्रीज दुधनी, शिवसेना शिंदे गट युवा नेते प्रथमेश भैय्या म्हेत्रे, नवभारत सामाजिक प्रतिष्ठान पदाधिकारी, जिल्हा परिषद कन्नड शाळा मुगळी मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग तसेच आरोग्य विभाग अधिकारी यांनी सहकार्य केले व मेहनत घेतली. 


प्रा आ केंद्रातर्फे वैद्यकीय अधिकारी डॉ अविनाश खेडकर, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ रेखा फड, आरोग्य सहायक श्री एम मुजावर, आरोग्य सेविका मंगल हुक्केरी, आरोग्य सेवक विष्णू, सूर्यकांत, जय, ॲम्ब्युलन्स सहायक विलास पोतदार, आशा गुरुबाई तळवार, ज्योती नंदुरे व संगीता जमादार यांनी  शिबिरास उपस्थिती लावून आपले कर्तव्य पार पाडले.


आयोजक मुस्तफा ईनामदार यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले आणि राजकारणापलीकडे समाजसेवेचा वारसा पुढे घेऊन जाण्याची इच्छा मनोगत सांगताना व्यक्त केली.