आई वडिलच सर्वश्रेष्ठ दैवत -अंजली व्हनमाने
अक्कलकोट (प्रतिनिधी)
अक्कलकोट तालुक्यातील कल्लप्पावाडी गावात श्री बिरलिंगेश्वर ढोळीन संघ श्रावण समाप्त कार्यक्रम मोठ्या उत्साहाने संपन्न.पहाटे श्री बिरलिंगेश्वर मंदिरात महापुजा करुन श्री बिरलिंगेश्वर महाराज पालखी व श्री मंगलदास महाराज पालखी गंगास्नान करुन गावातील प्रमुख मार्गानें मिरवणूक काढण्यात आली . यावेळी देवांचे पुजारी लोकांकडून पाणी पाऊस रोगराई शेतकरीच्या पिकाबद्दल भाकणुक झाले.व पुजारी शुभहस्ते फोटो पुजा करुन धनगर ओंव्याचे कार्यक्रम सुरूवात करण्यात आले. चनु बडदाळ , निंगराया,देवर गायन संघ बडदाळ व कुमारी.अंजली व्हानमाने श्री बिरलिंगेश्वर गायन संघ कंदलगांव याचे धनगर ओवी कार्यक्रम झाले. यावेळी अंजली व्हनमाने म्हणाले की मानवी जीवनात आपल्याला जन्म देणारे आई वडिलच सर्वश्रेष्ठ दैवत आहे ,आपले कर्म चांगले करावे व्यसन करुन नये.
व्यसनांने अनेक वाईट दुष्परिणाम होऊ शकतात असे म्हणाले दिवस भर महाप्रसाद वाटप करण्यात आले.या कार्यक्रमासाठी बोरोटी उडगी,सातनदुधनी,गळोरगी, जकापुर,तळेवाड या पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते.