तालुक्यातील जुगार अड्डा व अवैध दारु विक्री करणारे मालकांनवर कारवाई करा; शंकर म्हेत्रे
अक्कलकोट/ प्रतिनिधी-
तालुक्यातील हैद्रा, तोळणुर,मैंदर्गी येथे जुगार अड्डा मोठ्या प्रमाणात चालु आहे तर दुधनी, मुगळी जुगार बरोबर अवैध व बनावटी दारु विक्री करणारे मालकांनवर अद्यापही कारवाई झाली नाही असे शंकर म्हेत्रे यांनी सांगितले आहे.
सध्या तालुक्यातील हैद्रा व दुधनी येथे पोलिस प्रशासनांनी अवैध धंदे करणारे मालकांना सोडुन दुसर्यांनवर बोगस कारवाई केल्याची दावा सुध्दा शंकर म्हेत्रे यांनी म्हंटले आहे.
आम्ही पोलिस निरीक्षकांना याअगोदर निवेदन दिले आहे आणि अवैध धंदे व बनावटी दारु विक्री करणारे मालकांचे नावे देखील दिली आहे तरी ही हफ्ता घेऊन बोगस कारवाई करतात,पोलिस प्रशासन संविधानाचे अपमान करीत आहेत, जर हे असेच चालु राहिले तर आम्ही कोल्हापूर पर्यंत जाऊन निवेदन देऊ तिथेही कारवाई नाही झाला तर आंदोलनाची तयारी करु अशी आव्हान शिवसेनेचे नेते शंकर म्हेत्रे यांनी पोलिस प्रशासनाला दिली आहे.