Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

विजयपूरात मुसळधार पाऊस, पाण्याच्या प्रवाहात दुचाकी वाहून गेली

Responsive Ad Here


विजयपूरात मुसळधार पाऊस, पाण्याच्या प्रवाहात दुचाकी वाहून गेली






विजयपूर / प्रतिनिधी-दिपक शिंत्रे 

जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे ओढे-नाले भरून वाहू लागले आहेत. एक दुचाकीस्वार पूलावरून जात असताना, दुचाकी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली.  दुचाकीस्वार सुखरूप असून वाचला आहे. ही घटना जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील कळ्ळकवटगी–विजयपूर रस्त्यावर असलेल्या संगमेश्वर मंदिराजवळील ओढ्यात घडली आहे.सध्या पूलांवरील पाणी धोका पातळी ओलांडून वाहत आहे. कळ्ळकवटगी गावातील श्रीशैल गिडनवर या युवकाची दुचाकी ओढ्यात वाहून गेली आहे. दुचाकीसाठी गावकऱ्यांकडून शोधमोहीम सुरू आहे. तसेच संगमेश्वर मंदिर पूर्णपणे जलमय झाले आहे.