Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

क्रांतीकुमार तानाजीराव पाटील यांची पोलीस उपअधीक्षक पदी पदोन्नती

Responsive Ad Here

 क्रांतीकुमार तानाजीराव पाटील  यांची पोलीस उपअधीक्षक पदी पदोन्नती






पुणे/ प्रतिनिधी 

क्रांतीकुमार तानाजीराव पाटील  यांची पोलीस उपअधीक्षक पदी पदोन्नती होवून गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे पद स्थापना करण्यात आली आहे.शासन आदेशानुसार पोलीस उप अधीक्षक / सहा. पोलीस आयुक्त (निःशस्त्र)" या संवर्गातील पदावर पदोन्नती देण्याकरिता तयार करण्यात आलेल्या "पोलीस निरीक्षक (निःशस्त्र)" या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या "नियमित निवडसूची २०२४-२५" यामध्ये समाविष्ट असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना, "पोलीस उप अधीक्षक / सहा. पोलीस आयुक्त (निःशस्त्र)" या संवर्गातील पदावर सेवाज्येष्ठतेनुसार  पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे

क्रांतीकुमार तानाजीराव पाटील हे सांगली जिल्यातील तांदुळवाडी गावचे सुपुत्र आहेत.



क्राईम ब्रँच मधील त्यांची कामगिरी व कारकीर्द विशेष गाजली. त्यांच्या उल्लेखनीय कामाची दखल घेवून त्यांना पुणेचे पोलीस कमिशनर अमितेशकुमार यांनी नियुक्ती पत्र दिले.व अभिनंदन केले.पोलीस उप अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे नियुक्ती झालेल्या श्री पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.