एबीएम प्रस्तुत इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड २०२५ नेपाळ मध्ये यशस्वीपणे संपन्न
काठमांडू, नेपाळ / प्रतिनिधी-
एबीएम यांच्या तर्फे सादर करण्यात आलेला आणि अभा फाउंडेशन नेपाळ यांच्या सहकार्याने तसेच साऊथ एशिया समिट पार्टनरशिप (इव्हेंट पार्टनर) व समारी इव्हेंट्स नेपाळ (सहभागी संस्था) यांच्या सहकार्याने आयोजित इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड २०२५ नेपाळ हा भव्य सोहळा राष्ट्रीय नाचघर ऑडिटोरियम, जमल, काठमांडू येथे यशस्वीरित्या पार पडला.
या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. त्यामध्ये अब्दुल खान, माजी पाणीपुरवठा मंत्री, नेपाळ व
त्सेहरिंग ल्हामू लामा (तामांग), संसद सदस्य, नेपाळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.हा सोहोळा यशस्वी केलेल्या सर्व सहकारी, भागीदार, शुभेच्छुक आणि समर्पित टीमचे एबीएम व आयोजक मंडळ मनःपूर्वक आभार व्यक्त केले. प्रेरणा व गौरवाने सजलेला हा अविस्मरणीय सोहळा सर्वांच्या सहकार्याने यशस्वी झाला.