Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

दुधनीतील अवैद्य धंदे कधी बंद होणार?- शंकर म्हेत्रे

Responsive Ad Here

 दुधनीतील अवैद्य धंदे कधी बंद होणार?- शंकर म्हेत्रे 


समोरचा दरवाजा बंद करून मागचा दरवाजाने दारु विक्री 





अक्कलकोट- दुधनीत अवैध दारु, मटका, रेशन तांदुळ याची खुलेआम व्यवसाय सुरू असल्याची माहिती शंकर म्हेत्रे यांनी दिली आहे. अवैध व्यावसायिकांशी व काही पोलिस अधिकार्यांसह कर्मचार्यांचा अर्थ पुर्ण संबंधामुळे तालुका पोलिस प्रशासनाचे या प्रकारांकडे दुर्लक्ष होत आहे. 

     अवैध धंद्यांसह दारुच्या व्यसनापायी गावातील अनेकांची संसार अक्षरशः उध्दव्स्त झाले आहे, दुधनीत अवैध धंद्या विरुद्ध कारवाई व्हावी म्हणून अनेकांचे पोलिस ठाण्याचा उंबरठा झिजविलेत परंतु काही उपयोग झाला नाही. 

    तसेच अवैध धंद्यातील तांदुळ तस्करीचा प्रमाण दुधनीत जोमात चालु आहे, त्यावर देखील अद्याप कारवाई नाही, या व्यवसायाला शासकीय विभागाचे अभय मिळत असल्याचे खमंग चर्चा सुरू  आहे. 

 




    खाकीचा तो धाक कुठे आहे?


शहीद अशोक कामटेयांच्या काळात पोलिसांच्या  खाकीची वेगळीच धाक होती आता तो धाक कुठे गेला? दुधनी ते अक्कलकोट पर्यंत अनेक अवैध धंदे राजरोसपणे  चालु आहेत  ह्यांना का नाही खाकीची धाक?अवैध धंदे विरोधात अनेक वेळा प्रसार माध्यमातून पोलिस प्रशासनाला जाग करुन सुध्दा पोलिस प्रशासन " जाग मे निंद कर रही है " असे वक्तव्य शिवसेनेचे नेते शंकर म्हेत्रे यांनी म्हंटले आहे.