स्वराज्य माहिती अधिकार संघटनेचा सोलापूर जिल्हा मार्गदर्शन शिबीर आणि मेळावा संपन्न!
सोलापूर :- दि. 4 - *स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना सोलापूर जिल्ह्याचा 51 नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार, मार्गदर्शन शिबीर आणि मेळावा सोलापूरच्या हॉटेल साईप्रसाद येथे मोठया थाटात व शानदार पणे पार पडला.*
स्वराज्य चे मार्गदर्शन शिबीर आणि मेळाव्याचे उदघाटन *सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. इरेश स्वामी, जिल्हा सरकारी वकील ऍड. प्रदीपसिंग राजपूत, स्वराज्य चे संस्थापक तथा राष्ट्रीय महासचिव कमलेश शेवाळे, प्रदेशाध्यक्षा सौ. धनश्री उत्पात, विश्वस्त उमेश काशीकर, संचालक श्रीकांत देशपांडे, जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक* या प्रमुख मान्यवराच्या हस्ते भारत मातेचे प्रतिमेचे पूजन करून, दीप प्रज्वलीत करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत नूतन जिल्हा कार्याध्यक्ष सुनील पंडित यांनी केले तर प्रास्ताविक मनोगत स्वराज्य चे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक यांनी केले. तर उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा सत्कार शाल, मोत्याचे हार, पुष्पगुच्छ देऊन व फेटा बांधून स्वराज्य च्या विविध पदाधिकाऱ्यांनी केला.
*संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुका व 11 शहरातील नूतन 51 पदाधिकाऱ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्वराज्य संघटनेचे नियुक्ती पत्र, ओळख पत्र, मोत्यांचा हार घालून व फेटा बांधून पदग्रहण करण्यात आला.*
" *स्वराज्य नूतन पदाधिकाऱ्यांनी स्वराज्य च्या नावाला शोभेल असे समाज कार्य करावे आणि सामाजिक क्षेत्रात एक नवा आदर्श लोकांसमोर ठेवावा* "असे आवाहन सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. इरेश स्वामी यांनी केले.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हा सरकारी वकील ऐड. प्रदीपसिंग राजपूत म्हणाले, "*पोलिसांचे कर्तव्य जनतेचा सहभाग कसा व किती आहे, व पत्रकार संरक्षण कायद्याबाबत सरकारची भूमिका आणि पत्रकार बंधूनी समाजात कसे आदर्श पणे वागले पाहिजे, तसेच माहिती अधिकार संघटनेचा कार्यक्रत्याला ला आपले अधिकार आणि कर्तव्ये माहिती असणे आवश्यक आहे. कधी केव्हा कसं वागला पाहिजे याच भान असलं पाहिजे असे सांगून यापूर्वी घडलेले व वर्तमान काळात घडत असलेले अनेक उदाहरणे देऊन सडेतोड बहुमोलाचे मार्गदर्शन केले.*
स्वराज्य चे संस्थापक तथा मुख्य महासचिव कमलेश शेवाळे म्हणाले की *सोलापूर जिल्ह्यात 51 दिवसात 51नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्याचा विक्रम जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक यांनी केली आहे. त्यांचे व त्यांच्या टीम चे मि कौतुक करतो, अभिनंदन करतो असे म्हणत, सर्व पदाधिकाऱ्यांनी एक जुटीने आदर्श समाज निर्मिती साठी कार्य करावे व ओळख पत्राचा दुरुपयोग करू नये* असे भाषणातुन संभोधित केले.
*अनेक सरकारी, निमसरकारी कार्यालयात गोरगरीब जनतेच्या कामाची अडवणूक करून भ्रष्टाचार चाललेला असतो त्याला रोखणे हे स्वराज्य च्या नूतन पदाधिकाऱ्यांनी केले पाहिजे अश्या कार्यास संपूर्ण स्वराज्य संघटना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल* अशी ग्वाही प्रदेशाध्यक्षा सौ. धनश्री उत्पात यांनी दिली.
या प्रसंगी नूतन जिल्हा कार्याध्यक्ष सुनील पंडित, उपाध्यक्ष राजेंद्रकुमार रघोजी, सचिव सुधाकर शहाणे, सहसचिव दीपक कुरुलकर, कार्य. सदस्य किशोर बेजगम, सहसंपर्क प्रमुख गजानन सोनार, जिल्हा समन्वयक रोहित उपलाई कर, ऍड सुमित रघोजी, ऍड राहुल गायकवाड, वैकुंठ जडल, डॉ. भालचंद्र निकम, दिलिप क्षीरसागर, प्रसिद्दी प्रमुख अशोक मैंदर्गीकर आदी पदाधिकारी आणि सदस्यांनी विषेश परिश्रम केले.
यानिमित्य जिल्हा प्रभारी इफ्तेकार कामतीकर, जिल्हा महिला अध्यक्ष अर्चना कांबळे, उपाध्यक्ष सपना कांबळे
शहर अध्यक्ष विनोद भोसले सचिव प्रकाश चव्हाण शहर कार्याध्यक्ष दत्तात्रय दळवी, स्मिता पाठक आदी उपस्थित होते
सूत्रसंचालन.सौ. नीता रघोजी व किशोर बेजगम यांनी केले तर
आभार अशोक मैंदर्गीकर यांनी मानले.