निंगप्पा निंबाळ समाजकार्यात सक्रिय
दुधनी/ प्रतिनिधी
स्वतःपुरता विचार ही माणसाची मूळ प्रवृत्ती आहे.या प्रवृत्तीवर मात करत.स्वतःपोटाची खळगी भरण्याची वृत्ती न ठेवता. दुसऱ्याच्या पोटाची खळगी भरवणारा निंगप्पा निंबाळ याची एक छोटीशी यशोगाथा...
निंगप्पा निंबाळ सातवीपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेत.त्यानंतर १०वी परमशेट्टी प्रशालेत तर जुनियर कॉलेज दुधनी येथे बारावी पर्यंत शिकला.जिद्द व चिकाटीने अभ्यास करून तो डीएड व मुक्त विद्यापीठ पदवी प्राप्त केलं.एका सामान्य घरात जन्मलेल्या निंगप्पा निंबाळ यांनी मोठी स्वप्न पाहिली,
परिस्थितीशी दोन हात करून केवळ मेहनत जिद्द् आणि प्रामाणिकपणाच्या बळावर त्यांनी इथवरचा पल्ला गाठला आहे.
तालुक्यातील दुधनी येथे राहणाऱ्या निंगप्पा निंबाळ यांच्या कुटुंबाची परिस्थिती तशी फारच नाजूक होती.माझं मुलगा शिकल्यावर त्यांना सरकारी नोकरी मिळेल.या आशेने आई वडिलांनी त्यांना कबाड कष्ट करून शिकवलं.त्यांच्या परिवारात इथपर्यंत कोणी शिकले नव्हते.निंगप्पा त्यांच्या कुटुंबीयात उच्च शिक्षित होते.त्यांनी जिल्हा परिषद शाळेत अतिथी निर्देशक शिक्षक म्हणून सहा वर्ष शिक्षण क्षेत्रात काम केले.शासनाकडून कोणतीच अनुदान मिळेना. अशी प्रतिक्रिया निंगप्पा निंबाळ यांनी व्यक्त केले.