Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

सिन्नूरच्या सरपंच कल्पनाचं खडतर संघर्षातून प्रवास

Responsive Ad Here

 सिन्नूरच्या सरपंच कल्पनाचं खडतर संघर्षातून प्रवास






दुधनी/ प्रतिनिधी- निंगप्पा निंबाळ 

कल्पना सोनकांबळे यांनी आर्थिक संकटांवर मात करून कठोर मेहनतीच्या जोरावर सरपंचपदाची जबाबदारी पेलत असतांना पतीचा अचानक दुःखद निधन झालं.त्यात आई वडीलांचं देखील,कल्पना यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळत गेला.जगण्याची व सरपंचपद सांभाळावं अशी मुळात इच्छाच नव्हतीं,पाच वर्षाचा संपूर्ण कार्यकाळ पूर्ण करावं असं पतीचे स्वप्न होतं.पतीचे स्वप्न ,स्वतःचं कुटुंबाच आणि गावाचं ओझं एकट्या कल्पनाच्या खांद्यावर पडलं.

खडतर प्रवास त्यांच्या वाट्याला आल्या.अन्

कल्पना याचं संकल्पना कथेत रूपांतर झालं.

       एखाद्या व्यक्तीला कितीही मोठे दुःख किंवा कठीण प्रसंग आला तरी, ती व्यक्ती त्या परिस्थितीत खचून न जाता, धीराने आणि हिमतीने काम करत असते’हे वाक्य कल्पना यांच्या आयुष्यावर अगदी तंतोतंत लागू पडते.तालुक्यातील मुगळी या लहानशा गावात जन्मलेल्या कल्पना यांचे बालपण अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत गेले.वडील मोलमजुर होते.मोलमजुर करून कुटुंबाचा उदरनिर्वाह कराचा.या अत्यंत दारिद्र्याच्या काळातही कल्पना यांना शिक्षणाची ओढ होती.अशा कठीण परिस्थितीत शिक्षण दहावी पर्यंत झालं.