मंत्री शिवानंद पाटील यांचे मेव्हण्ये सुरेश पाटील यांचं निधन
विजयपूर/ प्रतिनिधी - दिपक शिंत्रे
कर्नाटकमधील मंत्री शिवानंद पाटील यांचे ज्येष्ठ बहिणींचे पती तसेच नामवंत फुटबॉल खेळाडू राहिलेले सुरेश परप्पा पाटील (वय ७७) यांचे मंगळवारी रात्री निधन झाले.
त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.
सुरेश पाटील हे एक नामवंत
फुटबॉल खेळाडू होते. विजयपूर जिल्ह्यात अनेक खेळाडूंना घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
त्यांचा पश्चात धर्मपत्नी महादेवी (श्रीसिद्धेश्वर बँकेच्या माजी संचालक ), मुलगी प्रीती पाटील, मुलगे नागराज पाटील आणि नटराज पाटील आणि इतर मोठा परिवार मागे ठेवून गेले आहेत.