मुगळी येथे पशुवैद्यकीय चिकित्सा आणि लसीकरण मोहिम....
दुधनी /प्रतिनिधी
पैगंबर मोहम्मद साहेब यांच्या १५०० व्या जयंतीचे औचित्य साधून अक्कलकोट तालुका येथील मोजे मुगळी येथे मुस्तफा ईनामदार मित्र परिवार व नवभारत सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच दुधनी श्रेणी १ पशुवैद्यकीय दवाखाना येथील पशुवैद्यकीय अधिकारी (श्रेणी १) श्री एस एस चराटे साहेब व सहकारी यांच्या सकारात्मक सहकार्याने १५०० व्या मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या जयंती चे औचित्य साधून मौजे मुगळी येथील पाळीव प्राणी, शेळ्या मेंढ्या, गायी व तत्सम प्राण्यांना रोग प्रतिकारक लसीकरण व लंपी रोगापासून प्रतिकार करण्यासाठी लंपी रोग प्रतिकारक लस व त्याच प्रमाणे इतर औषधोपचार मोहीम घेण्यात आली.
सदर मोहिमेत १०० पेक्षा जास्त जनावरांना लंपी प्रतिबंधक लस, शेकडो पाळीव प्राण्यांना रोग प्रतिकारक लस तसेच शेकडो नवीन जनावरांना टॅग देऊन शासकीय नोंद करण्यात आली.
पशुवैद्यकीय दवाखाना आणि त्यांचे अधिकारी मुक्या जनावरांच्या औषधोपचारासाठी कायम तत्पर आहेत व राहतील, आणि त्याच प्रमाणे पशुवैद्यकीय संदर्भात सर्व शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यात कार्यरत राहतील असे आश्वान अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले.
मोहम्मद पैगंबर साहेब हे साऱ्या जगा साठी शांतीदूत व अल्लाह कडून अख्या विश्वासाठी आशीर्वाद आहेत व जसे त्यांनी माणसांवर प्रेम करण्याचे उपदेश दिले आहेत तसेच मुक्या जनावरांना सुद्धा प्रेम, करुणा देण्याचे उपदेश दिले व त्याचेच आचरण करत ही मोहीम राबविल्याची माहिती मो मुस्तफा ईनामदार यांनी मनोगत व्यक्त करताना दिली.
सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी श्री एस एस चराटे, श्री शुक्ला व त्यांचे सहकारी, ग्रामपंचायत अधिकारी व सदस्य, कृषी उद्योजक मोहसीन भाई इनामदार, व मुगळी गावातील लाभार्थी शेतकरी यांचा सहभाग मिळाला.
