Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

ज्येष्ठ नागरिकांनी स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा केला

Responsive Ad Here

 


 ज्येष्ठ नागरिकांनी स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा केला  






मुंबई/ प्रतिनिधी- सुरेश पोटे 

 17 ऑगस्ट 2025 रोजी प्रणाम हॉटेल मध्ये द असोसिएशन फॉर सीनियर सिटीजन मँगो गार्डन चा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

या  विरंगुळा केंद्राच्या  अध्यक्ष सौ. लता प्रकाश पोवार आणि सरचिटणीस श्री. विलास बर्वे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. श्री. आर. सी. सिंग अध्यक्ष बी पी मारिन व श्री. सुरेश पोटे अध्यक्ष फेस्कॉम मुंबई नवी मुंबई विभाग त्याच बरोबर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम 17 ऑगस्ट रोजी घेण्याचे द असोसिएशन फॉर सीनियर सिटीजन मँगो गार्डन  येथील सदस्यांनी एक मताने ठरविले. भारत मातेच्या आत्मियतेमुळे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दिप प्रज्वलन श्री. आर. सी. सिंग व श्री सुरेश पोटे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच आलेल्या पाहुण्यांचे सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला टाळ मृदुंगांच्या गजराने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली आणि देशभक्तीच्या गीतांनी वातावरणच दणाणून गेले . नृत्य, नाट्य, गायन, वादन यामुळे सगळे वातावरणच आनंदी  झाले होते. रनिंग ट्रेन व बागवान 2 नाटक सादर करण्यात तो पूर्ण कार्यक्रमाचा आकर्षण बिंदू ठरला. राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाचा  समारोप करण्यात आला.