Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने पुढे जाणारी बी.एल.डी.ई संस्था – मंत्री एम.बी. पाटील

Responsive Ad Here

 


 गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने पुढे जाणारी बी.एल.डी.ई संस्था – मंत्री एम.बी. पाटील






विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

 वचनपितामह डॉ. फ. गु. हलकट्टी यांनी स्थापन केलेली भारतीय लिंगायत डेव्हलपमेंट एज्युकेशनल असोसिएशन (बी.एल.डी.ई) ही संस्था गेल्या 115 वर्षांपासून उत्तम शिक्षण देण्याच्या उद्देशाने कार्यरत असून, या भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळावे आणि तेही गुणवत्तेचे असावे, या दिशेने संस्था अग्रभागी असल्याचे मत बृहत 

आणि मध्यम उद्योगमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री एम.बी. पाटील यांनी व्यक्त केले.

    शुक्रवारी बी.एल.डी.ई डिम्ड विद्यापीठाच्या सभागृहात 

 आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, बी.एल.डी.ई संस्थेत सुमारे 4500 कर्मचारी कार्यरत असून, वैद्यकीय, तांत्रिक, कला, विज्ञान, वाणिज्य, व्यवस्थापन आदी क्षेत्रांतील विविध महाविद्यालयांमधून 36,000 हून अधिक विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जात आहे.

   बी.एल.डी.ई डिम्ड विद्यापीठाला राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेकडून 'A' ग्रेड मिळालेला आहे. याशिवाय आरोग्य सेवा पुरवणाऱ्या राष्ट्रीय मान्यता मंडळाकडून (2023–2027) BLDE रुग्णालयाला ४ वर्षांसाठी मान्यता मिळाली आहे. केंद्र सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्थेकडून २ वर्षांसाठी संशोधन संस्थे म्हणूनही मान्यता देण्यात आली आहे.

  गेल्या ३ वर्षांत विद्यापीठामार्फत विविध संशोधन उत्पादने साकारण्यात आली आहेत. बी.एल.डी.ई अ‍ॅलन करिअर अकॅडमीद्वारे 2025-26 शैक्षणिक वर्षापासून NEET, JEE, KCET परीक्षांसाठी प्रशिक्षण देण्यात येणार असून, पहिल्याच वर्षी 372 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्यामुळे बंगळूर व मंगळूरसारख्या ठिकाणी पीयूसी शिक्षणासाठी होणारी धावपळ थांबेल आणि सर्व सुविधा बी.एल.डी.ईच्या अंतर्गतच मिळतील.


हायटेक आयुर्वेद रुग्णालय व आधुनिक वैद्यकीय सेवा


विजयपूर जिल्ह्यातील आयुर्वेद महाविद्यालयात पंचकर्म व नेत्र चिकित्सा यांसह विविध आयुर्वेद पद्धतीच्या सेवा सुरू करण्यात येणार आहेत. बी.एम. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा विस्तार भाग म्हणून, आयुर्वेद व आधुनिक वैद्यकीय सेवा मिळवून देणारे एक केंद्र तयार करण्यात येत आहे. यामध्ये मेडिसिन, सर्जरी, पेडियाट्रिक्स, गायनॅकोलॉजी, ऑर्थोपेडिक्स यांसारख्या सुविधा तसेच आधुनिक लॅब, स्कॅनिंग सेंटर इ. कार्यान्वित होतील.


याचे उद्घाटन जुलै 27 रोजी ए.आय.सी.सी अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते श्री मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला बेंगळुरू बेलिमठाचे डॉ. शिवानुभ चरमूर्ती शिवरुद्र महास्वामीजी उपस्थित राहतील.


*नवीन संधी व ग्रामीण प्रतिभांना प्रोत्साहन*


बी.एम. पाटील फाउंडेशनमार्फत ग्रामीण विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नवे उपक्रम राबवले जातील. कौशल्य विकास, उद्योगांचे सहकार्य, कार्यशाळा, सतत शिक्षण यासाठी व्यासपीठ तयार केले जात आहे. उद्घाटनपूर्वीच 1200 विद्यार्थी पायलट प्रोग्राममध्ये सहभागी झाले असून, देशपातळीवरील हॅकाथॉन स्पर्धांमध्ये 450 विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळवले आहे.


नवीन CBSE शाळा आणि महाविद्यालये


विजयपूर जिल्ह्यातील बसवण बागेवाडी, देवरहिप्परगी आणि विजयपूर शहरातील अल-अमीन परिसरात लिंगराज संस्थेच्या जागेत तीन नवीन सीबीएसई शाळा सुरू करण्यात येणार आहेत. बसवण बागेवाडीत BCA आणि B.Pharm महाविद्यालयेही सुरू केली जातील. यासाठीची बांधकामे वेगाने सुरू आहेत.

त्याप्रसंगी  कुलाधिपती डॉ. वाय. एम. जयराज, कुलगुरु डॉ. अरुण चं. इनामदार, रजिस्ट्रार डॉ. आर. व्ही. कुलकर्णी, बी.एल.डी.ई वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद पाटील, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य मल्लिकार्जुन शेट्टी, आयुर्वेद कॉलेजचे प्राचार्य डॉ. अशोक पाटील, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य पी. मंजूनाथ, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश होन्नुटगी व डॉ. महांतेश बिरादार उपस्थित होते.