Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

मारहाण प्रकरणी दोघांना अटक

Responsive Ad Here


मारहाण प्रकरणी दोघांना अटक






विजयपूर/ प्रतिनिधी  - दिपक शिंत्रे  

"वाहन चालवण्याची (ड्रायव्हिंग) नोकरी करतो" असे सांगून रु वीस हजार आगाऊ रक्कम घेऊन नोकरीलाच न येता पैसेही परत न करणाऱ्या गोडीहाळ गावातील चालकाला, जिल्ह्याच्या हत्तल्ली गावात दिवसभर लोखंडी खांबाला साखळीने बांधून ठेवून, पायाला कुलूप लावून, जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली होती या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे 

    गोडीहाळ गावातील चालक बाशासाहेब अल्लावद्दीन मुल्ला (वय ३८) असं त्या चालकाचे नाव असून, या प्रकरणातील आरोपी चडचण येथील कुमार बिरादार आणि उमराणी येथील श्रीशैल पीरगोंडा यांनी एकत्र येऊन चडचाण येथून त्यास मोटारसायकलवर बसवून हत्तल्ली गावात आणले. तिथे मल्लिकार्जुन बिरादार यांच्या दुकानासमोर असलेल्या खांबाला साखळीने बांधून, पायाला कुलूप लावून, सकाळपासून संध्याकाळपर्यंत बेकायदेशीररीत्या बंदिस्त केले आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती 

   ही घटना प्रसार माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर चडचाण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी दिलेल्या माहितीनुसार  कुमार बिरादार व श्रीशैल पीरगोंड या दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.