Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

गवळी समाजाच्या श्री महालक्ष्मी आईची जत्रा सोमवार

Responsive Ad Here

 गवळी समाजाच्या श्री महालक्ष्मी आईची जत्रा सोमवार   





विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

येथील गवळी समाजाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री महालक्ष्मी आईची जत्रा दि  २१ रोजी मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरी होणार आहे. समाजातील सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आईचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

या जत्रेचा मुख्य कार्यक्रम सोमवार, दि. २१ जुलै २०२५ रोजी होणार असून, सकाळी  घागरी निघतील, तर सायंकाळी जातावरील गणी (नृत्य प्रदर्शन) आयोजित करण्यात आले आहेत.पहाटे ५ वाजता श्री महालक्ष्मी आईचा अभिषेक आणि आरती होणार आहे.तसेच दुपारी १२ वाजता म्हशी पळविण्याचा आणि टक्कर स्पर्धेचा कार्यक्रम होणार आहे. विजयपूर.समस्त गवळी समाज,  यांच्यावतीने सर्व भाविकांना जत्रा आणि सर्व कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.