Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

Responsive Ad Here

 


तलावात बुडून तरुणाचा मृत्यू



विजयपूर/ प्रतिनिधी - दिपक शिंत्रे 

 तलावात पोहायला गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विजयपूर तालुक्यातील **उत्नाळ** गावातील **द्यामण्ण भीमप्प किरु** (वय 31) हा तरुण मंगळवारी पोहण्यासाठी तलावात उतरला असता, पाण्यात बुडून मृत्यू झाला.

अग्निशमन दल व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. सलग दोन तासांच्या अथक शोध मोहिमेनंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला.

ही दुर्दैवी घटना विजयपूर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.