Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

कल्लप्पावाडी जि प शाळेत चिमुकल्यांची दिंडी सोहळा संपन्न

Responsive Ad Here

 कल्लप्पावाडी जि प शाळेत चिमुकल्यांची दिंडी सोहळा संपन्न






 अक्कलकोट (प्रतिनिधी )


अक्कलकोट तालुक्यातील कल्लप्पावाडी गावातील अंगणवाडीतील व जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा कल्लप्पावाडी येथील आषाढी एकादशी दिंडी मोठ्या उत्साहाने संपन्न. दिंडीत विठ्ठल रखुमाई ची पालखी तयार करून बिरप्पा डोणे व साक्षी सुतार व अंगणवाडी समर्थ डोणे कांजल पाटील यांना विठ्ठल रखुमाई करुन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष काशिनाथ कामगोंडे यांचे हस्ते पालखी चे पुजन करून विठ्ठल  नामघोषात गावातील प्रमुख मार्गाने दिंडी काढली.गावातील ग्रामदैवत श्री मंगलदास महाराज मंदिर येऊन विठ्ठलाच्या गीतवर नृत्य सादर केले.व फुगडी खेळले.या वेळी मुख्याध्यापक.अशोक गावडे प्रकाश खद्दे राजश्री सलगरे  लक्ष्मीबाई औराद भौरम्मा वागदरी मंगलताई कोकरे प्रिती पांढरे पुजा बंडगर भाग्यश्री हिरकुर गुरुबाई.स्वामी सुजाता सुतार सह ग्रामस्थ उपस्थित होते.