कु.विविधा अल्लमप्रभु हिस एमबीबीएस पदवी प्रदान व सन्मान
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
जॉर्जिया देशाच्या राजधानी टिब्लिसी येथील *जॉर्जियन नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी कडून एमबीबीएस पदवी* प्राप्त केलेल्या *विजयपूरच्या विविधा अल्लमप्रभु मल्लिकार्जुनमठ हिला युनिव्हर्सिटीच्या पदवीदान समारंभात सन्मानित करण्यात आले.
या समारंभाला युनिव्हर्सिटीचे संस्थापक *GIA KAVTELISHVILLI*, लेडी डीन SMT. MAIA ADVADGE आणि रेक्टर *MARTVILI CANYON उपस्थित होते.
दोन वर्षांपूर्वी युक्रेन युद्धात अडकून कुमारी विविधाने अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्यानंतर तिने शिक्षणासाठी जॉर्जिया देशात स्थलांतर केले आणि शिक्षण पुन्हा सुरू करून ते पूर्ण केले.
कर्नाटकातील लोकांच्या शुभेच्छा आणि पाठिंब्यामुळे विविधाला जणू दुसरे आयुष्य लाभल्यासारखे झाले आणि आज तिचे यश खरोखरच कौतुकास्पद आहे
या महत्त्वाच्या क्षणी तिचे वडील *अल्लमप्रभु आणि आई भुवनेश्वरी तिच्यासोबत उपस्थित होते, ही एक खास बाब ठरली.