आषाढी एकादशी निमित्त काळेगाव येथे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन
भव्य कीर्तन, भरुडांची जुगलबंदी भजन, असे अनेक कार्यक्रम
अक्कलकोट / प्रतिनिधी- प्रविणकुमार बाबर
तालुक्यातील सांगवी बु लगत असलेले काळेगाव येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आयोजित आषाढी एकादशी निमित्ताने अनेक भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, हरिपाठ, भव्य कीर्तन सोहळा व भरुडांची जुगलबंदी असे अनेक कार्यक्रम आषाढी एकादशी निमित्त असून, त्याची रूपरेषा रविवारी दि. 06 रोजी पहाटे 4 वाजता श्रीच्या मूर्तीस अभिषेक महापूजा व नंतर दिवसभर फराळीचा कार्यक्रम दरम्यान, दुपारी 12ते 04 पर्यंत श्री राम कृष्ण हरी महिला भजनी मंडळ अक्कलकोट यांचे भजन कार्यक्रम व सायंकाळी 5 ते 7 श्री संत मारुती महाराज शिक्षण संथा कानेगाव यांचे हरिपाठ व तद नंतर रात्री 8 ते 11.30 पर्यंत भव्य कीर्तनकार ह भ प राजेश महाराज पाटील भालकी, जि बिदर यांचे कीर्तन होणार आहे. तसेच रात्री 11.30 ते पहाटे 4 वाजेपर्यंत भरुडांची जुगलबंदी कार्यक्रम संपन्न होणार असून, दुसऱ्या दिवशी दि. 07 सोमवार रोजी सकाळी पासून दिवसभर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या आषाढी एकादशी निमित्त अतिशय भक्तीमय वातावरणात अनेक भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न होणार असून या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी पंचक्रोशीतील भविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आव्हान काळेगाव विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
