आभार फाउंडेशनच्या वतीने लोणी काळभोर मध्ये सामाजिक उपक्रम -शिवरूप तुपे
लोणी काळभोर/ प्रतिनिधी
लोणी काळभोर- तिर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदीर वन विभाग हद्दीत आभार फाउंडेशन महाराष्ट्र राज्य राज्य चे संस्थापक अध्यक्ष शिवरूप तुपे यांच्या वाढदिवसानिमित्त ५०० हून अधिक वृक्षांच्या वृक्षारोपण कन्या प्रशाला लोणी काळभोरच्या ६० मुलीनी २०० वृक्षांचे वृक्षारोपण केले. तर पृथ्वीराज मेमोरिअल हायस्कुल च्या ७० विद्यार्थानी ३०० वृक्षारोपण केले.
आभार फाउंडेशनच्या वतीने कन्या प्रशाले मधील विद्यार्थ्यांनीना मोफत छत्रीचे वाटप करण्यात आले तसेच पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड चे प्रबंधक गौरव सर गुप्ता ,सी ए असिस्टंट मनोज पाटील, आभार फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शिवरूप तुपे, ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, ग्रीन फाउंडेशन सचिव प्रतीक कोळपे,ग्रीन फाउंडेशन पुणे जिल्हाध्यक्ष अजित साळुंखे, ग्रीन फाउंडेशन हवेली तालुका अध्यक्ष गणेश काळभोर, आभार फाउंडेशन चे अक्षय देवकर ,चेतन बोडरे ,श्रीकांत झुंझुर्के ,संतोष वडुडे,अजय यादव ,अमोल बंधारी ,राम शिंदे, नागेश भाऊ,दिलीप शेवाळे, संदीप जारे उपस्थित होते.
तसेच आभार फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल लोणी काळभोर, कन्या प्रशाला लोणी काळभोर, ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य उपस्थित होते.